Download App

अंजली दमानिया या स्वतःच न्यायपालिका; अजितदादा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar Group Anand Paranjpe On Anjali Damania : राज्यात संतोष देशमुख हत्या (Santosh Dighe) प्रकरणामुळे वातावरण तापलेलं आहे. काही सत्ताधारी नेते अन् विरोधी पक्षाने मंत्री धनंजय मुंडेंची मागणी लावून धरलीय. पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) आरोपांची बरसात केली होती. त्यावरून आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुख्य प्रवक्ते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी (Anand Paranjpe)अंजली दमानिया यांच्यावर हल्लाबोल केलाय.

आनंद परांजपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी सुरू आहे. अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणता निर्णय घ्यायचा नाही. हीच पक्षाची भूमिका आहे. ठोस पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत मुंडेवर कारवाई नसल्याचं देखील परांजपे यांनी स्पष्ट केलंय.

यावेळी आनंद परांजपे यांनी अंजली दमानियांवर देखील निशाणा साधलाय. अंजली दमानिया यांननी दिलेली कागदपत्रे म्हणजे ठोस पुरावा या निष्कर्षावर येण्याची किंवा घाई करण्याची गरज नाही. मागेच पक्षाने भूमिका मांडताना स्पष्ट केलंय. अजितदादा यांनी देखील काही दिवसांपूर्वी हेच सांगितलं होतं, असं देखील आनंद परांजपे यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सांगितलंय की, चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास, योग्य ती कारवाई केली जाईल.

राजन साळवींच्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटात नाराजीचा सूर; पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

अंजली दमानिया यांनी स्वतःचं कम्प्लेंट करायची. स्वतःच इन्वेस्टीगेटिंग एजन्सीचं काम करायचं अन् स्वतःच न्यायपालिका हून एखादा व्यक्ती दोषीय, अशा निष्कर्षाला येण्याची गरज नाही. त्यांनी जी कागदपत्र दिलीत, ती अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री यांना दिलेली आहेत. त्यांनी दिलेली कागदपत्र सत्य आहेत असं देखील मानण्याची गरज नाही. त्या दिलेल्या कागदपत्रांच्या आढावे देखील चौकशी होईल. त्यामुळे चौकशीचा अंतिम निर्णय येतो किंवा निष्कर्ष येईपर्यंत त्यांनी देखील थांबावं, असं आवाहन देखील आनंद परांजपे यांनी केलंय.

रोज उठून आरोप करण्याची गरज नाही असं मला वाटतं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायपालिकेकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि सात जणांची कोर कमिटी स्थापन करण्यात आलीय. येणाऱ्या पक्षाच्या बांधणी निमित्ताने पक्षाच्या असलेल्या धोरणाबाबत भविष्यामध्ये पक्षाने कुठले कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले पाहिजेत.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सात जणांची फोड कमिटीची स्थापना करण्यात आली, असं ते म्हणालेत.

अंजली दमानिया यांनी जे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले होते. ज्या चौकशीची मागणी केली होती, त्या सर्व चौकशा चालू आहेत. त्यांनी जी जी कागदपत्रं अजितदादा पवार यांना दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली ही कागदपत्रं इन्वेस्टीगेटिंग एजन्सीला पुढे करण्यात आलेली आहेत. त्या जे ठोस पुरावे वाटतात, त्याबाबत पत्रांच्या आधारे देखील चौकशी चालू आहे.

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘ओ बावरी’ प्रदर्शित

स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाशी सर्वप्रथम जरी जबाबदारी ही सरकारची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे बंधू असतील, धनंजय देशमुख यांना कुठल्याही प्रकारे केसालाही धक्का लागणार नाही. पूर्ण संरक्षण त्यांच्या कुटुंबाला मिळालं पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलंय.

 

follow us