Download App

“मी शूद्र, त्यामुळे माझा ‘तसा’ उल्लेख” : ‘जातीचा’ दाखला देत तटकरेंची सुप्रिया सुळेंवर टीका

नागपूर : मी शूद्र आहे, म्हणजे अ‍ॅक्युट मायनॉरिटीमधील आहे, त्यामुळे मी कदाचित सॉफ्ट टार्गेट असू शकतो, माझ्यावर टीका केल्याने काही तरी साध्य होत असेल. त्यामुळे ती टीका होते की काय मला कळत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गट कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली. तटकरे रविवारी नागपूरमध्ये पक्षाच्या मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (NCP (Ajit Pawar) state president and MP Sunil Tatkare criticized NCP (Sharad Pawar) working president and MP Supriya Sule)

सुप्रिया सुळे तुमच्याबाबत सतत ‘ते खासदार, ते खासदार’ असा उल्लेख करत असतात, महिला आरक्षण विधेयकावेळीही ते खासदार एका उद्योगपतीच्या घरी दर्शनासाठी गेले. तर तुमचा ‘ते खासदार असा सतत उल्लेख का करत असतात? असा सवाल एका पत्रकारांनी खासदार तटकरे यांना विचारला. यावर बोलताना तटकरे यांनी आपल्या जातीमुळे असा उल्लेख होत असावा अशी शंका व्यक्त करत खासदार सुळे यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले सुनील तटकरे?

महासंसदरत्न माझा नेमका तसा उल्लेख माझा का करतात हे मला अजूनही कळलं नाही. कारण माझी स्वतःची आयडेंटिटी मी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितली. म्हणजे माझ्या नावापासून, माझा जन्म कधी झाला आणि माझा राजकीय प्रवास कसा झाला ते मी सर्वांसमोर ठेवले. कदाचित, मी शूद्र आहे म्हणजे अ‍ॅक्युट मायनॉरिटीमधील आहे, मायन्यूट मायनॉरिटीमधील आहे. मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्याबद्दलचा आदर अनेकवेळा पवार साहेब व्यक्त करतात. पण मी कदाचित सॉफ्ट टार्गेट असू शकतो आणि टीका केल्यानंतर काही तरी साध्य होत असेल. त्यामुळे ती टीका होते की काय मला कळत नाही.

अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान

एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं, पावलोपावली चव्हाण साहेबांची संस्कृती म्हणायचे आणि एखादी व्यक्ती जी दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करत आहे, ध्येय-धोरणांशी सुसंगत काम करते आहे त्यांचा उल्लेख नाव न घेता व्यक्ती व्यक्ती सतत करत राहायचं. मला असं वाटतं की महाराष्ट्राला काही भुषणावह नाही. त्यामुळे संसदरत्न जे बोलतात त्याच्याबद्दल माझी फारशी हरकत असण्याचं काय कारण नाही. पण ते तसं होतचं. त्यांना राग का आला ते मला माहित नाही.

कारण परवा ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेला सुनावणी होती. आम्हाला बघितल्यावर संताप अनावर होणं आम्ही समजू शकतो. पण मी आयुष्यात टिपटॉप म्हणजे व्यवस्थित राहतो. म्हणजे कपडे फाटलेले असले तरी चालते, पण मळके चालत नाहीत. काही लोकांना अघळपघळ राहण्याची सवय असते, त्याच्यावरती काही लोकांचा लोभ असतो. मला मात्र चांगला राहायचं सवय आहे.

Ajit Pawar : माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; अजितदादांच्या मातोश्रींची इच्छा

मला लहानपणी काकीने गॉगल दिला होता. मी त्यादिवशीसुद्धा गॉगल घालून होतो, म्हणून कोणी काय चॅट केलेत, काय काय त्याच्यावरती केले ते मला माहिती आहे. पण मला त्या बाबतीमध्ये फारसे काय बोलायचं नाही. पण जोपर्यंत आपली नियत साफ आणि आपलं मन साफ आहे, पक्षाबद्दलची आणि नेतृत्वाबद्दलची आपली बांधिलकी आहे त्यावेळी कोण आपला काय उल्लेख करतो हे माझ्यासाठी काय फारसं महत्त्वाचा नाही.

पण महाराष्ट्र असं बघतोय कारण सतत सतत व्यक्ती, गृहस्थ, गृहस्थ असं बोलणं, संसदेमध्ये पावणे पाच वर्षे एकत्रित काम केलं, संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलं तरी सुद्धा असा का उल्लेख होतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी क्षुद्र असेन,मी बलुतेदारांपैकी एक आहे. त्याच्यामुळे कदाचित तशी संभावना असेल. पण मला त्याच्याबद्दल दुःख होण्याचं काही कारण नाही. कारण राजकारणामध्ये काही गोष्टीला सामोर जावं लागत असतं आणि दादांचे नेतृत्वात सामोरं जाण्याची हिंमत आम्ही सर्वांनी बाळगलेली आहे, असही तटकरे म्हणाले.

Tags

follow us