Sharad Pawar : इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांच्या निशाण्यावर असलेल्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दाखल झाले आहेत. येथे एका खासगी कार्यक्रमासाठी पवार आल्याचे सांगितले जात असले तरी पवारांचा हा दौरा राजकारणात चर्चेचा ठरत आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि अदानी यांच्या संबंधांवरून काँग्रेस रोजच टीका करत असताना पवारांनी पुन्हा एकदा वेगळं पाऊल टाकल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीनुसार, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या गुजरातमधील घरी शरद पवारांनी भेट दिली आहे. अंबानी कुटुंबात काहीतरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पवार म्हणाले..;हिंडेनबर्ग कोण आहे? मला माहिती नाही
अंबानी आणि पवार यांच्यातील वैयक्तिक संबं मित्रत्वाचे आहेत त्यामुळे पवार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आज शरद पवार अदानींच्या घरी मुक्काम करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील. शरद पवार खासगी कार्यक्रमानिमित्त गुजरात दौऱ्यावर आहेत पण त्यांनी आज गौतम अदानी यांच्या घरी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीत दोघांत काय चर्चा होते याचीही उत्सुकता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांकडून अदानी सातत्याने टार्गेट होत आहे. मोदी सरकारबरोबरचे त्यांचे संबंध पाहता काँग्रेस आधिक आक्रमक असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीत सहभागी आहेत. अदानी आणि त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुनच शरद पवारांची भूमिका दिसते. मात्र, त्यांच्या या दौऱ्याने काँग्रेसची पंचाईत झाल्याची चर्चा आता होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हिंडेनबर्ग कंपनीने अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालावरून अदानी समुहाचे नुकसान तर झालेच शिवाय देशाच्या राजकारणात यावर मोठा गदारोळ उठला होता. काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांनाच धक्का देणार वक्तव्य केले होते.
Rohit Pawar : ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवारांनी सांगितलं राजकारणात का आलो ?
हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय?, हे मला माहितीही नाही. एक परदेशातील कंपनी काही तरी अहवाल बनवते व त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, हे योग्य नाही.महाराष्ट्राला सर्वाधिक विजेचा पुरवठा हा अदानीं समूहाच्या कंपनीकडूनच होतो आहे. पंरतु याबाबत मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान हे मान्य करावे लागेल.
या पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असत. मात्र, नंतर ज्येष्ठ उद्योगपती टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल असे शरद पवार यांनी सांगत विरोधकांच्या विरोधातील हवाच काढून टाकली होती.