Download App

NCP Crises : अजितदादांचा राग पण कोल्हे थेट लंकेंच्या मंचावर झळकणार, लोकसभेपूर्वीच लंकेंचे ‘महानाट्य’

  • Written By: Last Updated:

NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन नेते कार्यक्रमाच्या माध्यमातून एका व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लोकसभेपूर्वी आमदार निलेश लंके यांचे हे महानाट्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे.

Prakash Ambedkar : नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय; आंबेडकरांचा टोला

शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक एक ते चार दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आले आहे याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

रुग्णांचा जीव वाचवणे 6 हजार कोटींनी महागले! ‘108’ रुग्णवाहिकांसाठी शिंदे सरकारने वाढवले तिप्पट बजेट

अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचे आयोजन यावर लंके यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावरती प्रकाश टाकण्याचे काम अमोल कोल्हे यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेने राज्यभर महाराजांचे विचार हे घरोघरी गेले ते विचार आपल्याला प्रत्यक्षरीत्या पाहायला मिळावे यासाठी आपण हे महानाट्याच्या आयोजन केले आहे यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही असे देखील नक्की म्हणाले.

नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा जरांगेंना थेट इशारा

एखाद्या कलाकार एखाद्या पिक्चर मध्ये काम करतो तो एखाद्या निवडणूक पक्ष पार्टीचा असतो म्हणजे काय तो पिक्चर काय तवा पार्टीचा झाला काय असा सवाल देखील यावेळी लंके यांनी केला आज अनेक कलाकार हे राजकारणाशी निगडित आहे याचा अर्थ त्या विचाराच्या पक्षाच्याच लोकांनी तो पिक्चर पाहायचा असा अर्थ होतो का दुसऱ्या विचाराच्या लोकांनी तो पिक्चर पाहायचा नाही का असं लंके म्हणाले.

कोल्हे हे अजित पवारांवर जाहीर टीका करत असतात यावरती लंके यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की हा राजकारणाचा भाग वेगळा आहे राजकीय व्यासपीठावर असतात ते एका पक्षाचे नेते असतात. या महानाट्याच्या व्यासपीठावरती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत यामुळे ह्या गोष्टीला राजकीय दृष्टिकोनातून पाहणे ु चुकीचे आहे असं लंके म्हणाले

आमदार अपात्रता निकालावर लंके म्हणाले

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते वर निकाल जाहीर केला.शिवसेनेत प्रमाणेच राष्ट्रवादीचे देखील सर्व आमदार यांना पात्र ठरविण्यात आल्याचा निकाल नार्वेकर यांनी जाहीर केला. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके म्हणाले की प्रत्येक नेत्याला एक साखळी असते प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला एक नेता असतो नेत्याने एखादी भूमिका मांडली त्यावर कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडायचे नाही. मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता असून या वक्त या गोष्टीवर तुम्ही बोलणं उचित नाही असे यावेळी बोलताना लंके म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज