Download App

NCP Crisis : राष्ट्रवादी आमचीच! ‘त्या’ नोटिसीला अजित पवार गटाचं 260 पानांचं उत्तर

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद (NCP Crisis) आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केली म्हणून आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. त्यावर विधीमंडळाने दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला अजित पवार गटाने तब्बल 260 पानांचे उत्तर दिले असून राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रतोद अनिल पाटील यांनी सुद्धा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यावर आता विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे.

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? शरद पवार अन् अजितदादांसाठी आजचा दिवस महत्वाचा

विधीमंडळाने शरद पवार गटाच्या आमदारांनाही नोटीस दिली होती. आमदार अपात्रता प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीला आमदारांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणात काय निर्णय देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीत काय होते हे अद्याप समजलेले नाही.

अजित पवारांचा पक्षावरच दावा 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात निवडणूक आयोगातही सुनावणी होत आहे. सुनावणी होऊन आयोग या प्रकरणात निर्णय देईल अशी शक्यता आहे. तसेच ही सुनावणी कदाचित पुढे लांबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

NCP Political Crises: अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांचेही खोटे प्रतिज्ञापत्र; शरद पवार गटाचा गंभीर आरोप

 

Tags

follow us