NCP Crisis : अजित पवार गटाची मोठी खेळी; सुनावणीआधीच सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका
NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट (NCP Crisis) सत्तेत सहभागी आहे. मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी सुरू होण्याआधीच अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि अनिल पाटील यांच्यावतीने या याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर आजच सुनावणी होईल, अशी शक्यता आहे.
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे-पवार एकत्र; आज होणार ‘सुप्रीम’ सुनावणी
अजित पवार गटाने दाखल केलेल्या या तिन्ही याचिका न्यायालयाने स्वीकारल्या आहेत. त्यांच्यावतीने 3 वकिल बाजू मांडणार आहेत. त्यामुळे यावर आता कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्षांनी कोर्टासमोर रुपरेषा दाखल केलेली नाही. कोर्ट अध्यक्षांना निर्देश देऊ शकते, निर्णय देऊ शकत नाही, अशी माहिती अजित पवार गटाच्या वकिलांनी दिली. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यात आहे. त्यामुळे आम्हाला यात बोलण्याला स्कोप मिळत नाही. आम्हाला आमचं मत मांडायचं आहे. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती अजित पवार गटाने कोर्टाला केली आहे.
शरद पवार गटाच्या याचिकेत नेमकं काय ?
शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावा यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे. या दोन्ही याचिका एकाच प्रकारच्या असल्याने यावर कोर्ट कदाचित काहीतरी निर्णय देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान, काल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर तिसरी सुनावणी झाली. यावेळी सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली. या सुनावणीला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 20 तारखेला होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.