अजित पवार पुन्हा नाराज? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar On Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)नाराज होऊन माध्यमांशी न बोलताच निघून गेले. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला पण त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड […]

Rohit Pawar Ajit Pawar

Sharad Pawar, chief of the Nationalist Congress Party (NCP), has been promoting his grandnephew Rohit Pawar as the party’s young face

Rohit Pawar On Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)नाराज होऊन माध्यमांशी न बोलताच निघून गेले. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला पण त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी अशी कुठलीही नाराजी नसल्याचं सांगितलं आहे. अजितदादांकडे विरोधीपक्ष नेतेपद असताना जर त्यांना पक्षाचं पद दिलं तर पक्षावर अन्याय झाला असता असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. (ncp-executive-chairman-rohit-pawar-on-ajit-pawar)

Ajit Pawar यांनी ‘तो’ प्रस्ताव दिल्याने सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्या; वंदना चव्हाणांचा गौप्यस्फोट

रोहित पवार म्हणाले की, अजितदादा माध्यमांशी गेले न बोलता निघून गेले, त्याचा मागचा इतिहास काढून पाहा. अजितदादा नेहमी नेहमी माध्यमांसमोर येतात असं नाही. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदानंतर कोणतं मोठं पद असेल तर ते विरोधी पक्षनेतेपद ते आज अजितदादांकडे आहे.

हृदयात महाराष्ट्र… नजरेसमोर राष्ट्र; पवारांच्या घोषणेनंतर अजितदादाचं ट्वीट

आमदार म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं घेत असतो. एखादं महत्वाचं पद त्यांच्याकडं असतं तेव्हा, त्यांचंही मत आहे आणि सर्वांचचं मत आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती आणि मंत्री असताना जर पक्षाचं एखादं पद त्यांच्याकडं असेल तर राज्यावर तरी अन्याय होईल किंवा पक्षावर तरी अन्याय होईल.

तसंच अजितदादांकडे विरोधीपक्ष नेत्याचं पद असताना जर पक्षाचं पद त्यांना दिलं असतं तर पक्षावर कुठेतरी अन्याय झाला असता, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.

आज महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडत असतात, विरोधी पक्ष म्हणून ते मांडत असतात, म्हणून त्यांचंही पद महत्वाचं संविधानिक पद असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

Exit mobile version