हृदयात महाराष्ट्र… नजरेसमोर राष्ट्र; पवारांच्या घोषणेनंतर अजितदादांच ट्वीट
Ajit Pawar on Sharad Pawar Big Annaouncement: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर राजकीय वर्तळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली मात्र विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रसामाध्यमांशी बोलणे टाळले. मात्र ट्विट करत त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पवार यांनी ट्विट मध्ये म्हटले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.
मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन! असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
दरम्यान, याआधी मुंबईत वर्धापनदिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतनिधींनी याबाबत अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली होती. पण त्याठिकाणी ढोल ताशांचा आवाज सुरू होता. त्यामुळे त्यांनी बोलणे टाळले. त्यानंतर ते आपल्या कारमधून तेथून निघून गेले. त्यांच्या या कृतीनंतर अजित पवार पुन्हा नाराज झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे