अजितदादांच्या प्रस्तावानंतरचं भाकरी फिरली; वंदना चव्हाणांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Vandana Chavhan on Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर अजित पवार यांनी या नेमणुकांवर माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ( Ajit Pawar proposal for Supriya Sule NCP Executive Chairman Expose by Vandana Chavhan )
हृदयात महाराष्ट्र… नजरेसमोर राष्ट्र; पवारांच्या घोषणेनंतर अजितदादाचं ट्वीट
त्यादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यक्रमात शरद पवारांनी ही कार्यकारी अध्यक्षांच्या नेमणुकीची घोषणा केली आहे. मात्र यावेळी हा कार्यक्रम संपल्या संपल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मात्र तेथून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते कुठे आणि का गेले? याबद्दल वंदना चव्हाण यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘अजितदादांना योग्य संदेश दिलाय’; राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष निवडीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया
वंदना चव्हाण म्हणाल्या की, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणुक झाली याचा आनंद झाला आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांवर देखील विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्याने आम्हाला देशात ताकद वाढवण गरजेचं आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आहे. असं देखील त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितेले की, ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. यानंतर काय असा प्रश्न विचारला जात होता. साहेबांनी राजनामा मागे घ्यायाला नकार दिला तर काय कारायचं त्यावेळी अजित पावारांनीच सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात याव यासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. असा मोठा गौप्यस्फोट वंदना चव्हाण यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांच्या नवीन पदाधिकाऱ्यांना ट्विटद्वारे शुभेच्छा!
दरम्यान अजित पवार यांनी ट्विट करत त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पवार यांनी ट्विट मध्ये म्हटले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन! असेही त्यांनी म्हटले.