Download App

क्षमाशील सरकार, खुन्यांना मोकळं सोडा; जितेंद्र आव्हाडांचा नेमका कोणावर निशाणा?

  • Written By: Last Updated:

NCP Jitendra Awhad On Somnath Suryavanshi Death : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची (Jitendra Awhad) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) वक्तव्य केलंय. परभणीत काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता, तो काल नाशिकपर्यंत आला अन् अचानक थांबला. नंतर समजलं की, सरकारचे दोन दूत तिथे गेले होते, त्या दुतांनी मध्यस्थी करून पत्रामधून काही मागण्या मान्य केलेल्या दाखवल्या आहेत. यापैकी एकही मागणी मान्य झालेली नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तसंच हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला केलाय.

ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवला… हात जोडून मागितली माफी

या कोम्बिंग ऑपरेशनच्या लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? असा देखील सवाल त्यांनी केलाय. आतापर्यंत हवालदार सस्पेन्ड न करता अचानक चार हवालदार कसे सस्पेन्ड केले? सरकारने हे दूत पाठण्याचं काम का केल? हा दूत सभेत जावून म्हणतोय की, जावू द्या. खून झालाय, सोडून द्या. म्हणजे तो मागिसवर्गीय आहे, त्याच्यामागे समाज नाही. त्यामुळे खून झालाय, सोडून द्या. एवढे क्षमाशील झालाय तुम्ही? सगळे जेल मोकळे करा, सर्वांना खून माफ करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

याप्रकरणी बोलताना ते म्हणाले की, हा बोलणारा दुसरा-तिसरा कोणी नव्हता. तो तिथे गेलेला सरकारचा दूत बोलत होता. आईच्या पोटचा पोरगा गेलाय. तिच्या यातना काय आहेत? ज्या आईने दहा लाख नाकारलेत, त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका. राजीव गांधींच्या हत्यांऱ्यांना शिक्षा झाली होती, तेव्हा राहुल गांधी-प्रियांका गांधीने आरोपीला माफ करायचा निर्णय घेतला. पण कायद्याने ते मान्य केलं नाही.

विकसित भारतासाठी राजकारणात या; पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचं तरूणांना आवाहन

माफ करा माफ. जर माफच करायचं ना तेव्हा मग आता बाहेर या. मोठ्या मनाने वाल्मिक कराडला देखील माफ करून टाकू या. मी अक्षय शिंदेवर बोललो, तेव्हाही ते बोलले होते. भूमिका बदलता कामा नये. जर संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झालीये, तर मग सोमनाथ सुर्यवंशीची देखील हत्याच आहे अन् अक्षय शिंदेची देखील क्रूर हत्याच आहे. ते तिनही खूनच होते. त्यांना क्षमा करण्याची कोणतीही तरतूद संविधानात नाही. नवीन संविधानाचं निर्माण करा, हवे ते खून माफ करा.

सरकारने पंधरा पुढच्या दिवसांत एक पॉलिसी आणावी. सगळ्यांना सांगावं की, सर्वसामान्यांचं सरकार आहे. क्षमाशील शासन आहे. आम्ही सगळ्या खुन्या्ंना मोकळं सोडतोय. एकट्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना का माफ करायचं? हे जे बोलतंय ना, ते डोक्यात घुसलेलं चातुर्यवाद, वर्णवर्चस्ववाद असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. सोमनाथ सूर्यवंशी दलित समाजाचे आहेत. आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पाठीमागे कोणी नाही. मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? आम्ही न्याय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण होत आहे, त्यामुळे कोर्टाला टाळं ठोका असं आव्हाड म्हणालेत.

 

follow us