Download App

राज ठाकरेंनी मी डोळा मारल्याची दखल घेतली; अजित पवारांनी सभागृहातच सांगितले

  • Written By: Last Updated:

काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर स्वत त्यांनी सभागृहात उत्तर दिले आहे.

चुकून डोळा बंद केला तर डोळा मारला, डोळा मारला अशी चर्चा होते. काही वेळापूर्वी मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसलो होतो. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना डोळा मारला. पण तिथे कॅमेरे नव्हेत म्हणून बरे झाले, असे मिश्किलपणे अजित पवार म्हणाले आहेत.

Nana Patole : अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर

त्यादिवशी मी बोलत असताना उद्धवजी आले व मी डोळा मारला. तेव्हा सर्वत्र असे पसरले की मी उद्धवजी आले म्हणूनच डोळा मारला. हे बरोबर नाही. राज ठाकरेंनी देखील मी डोळा मारल्याची नोंद घेतली, असे अजित पवार म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी विधानभवनाच्या आवारात पत्रकार परिषद सुरु होती. तेव्हा अजित पवार माध्यमांशी बोलत होते. तेव्हा अचानक उद्धव ठाकरे तिथे आले व माध्यमांसमोर बोलायला लागले. तेव्हा अजित पवारांनी कुणाकडे बघून डोळा मारला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला होता.

Ajit Pawar यांचा फडणवीसांवर हल्लाबोल… विरोधकांना काय जेलमध्ये टाकता!

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. अजित पवारांनी नेमका डोळा कुणाला मारला हे मी कसं सांगू शकतो असे म्हणत ते म्हणाले की, ते दादा आहेत. त्यांनी डोळा कुणाला मारला हे त्यांनाच विचारावं लागेल. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांनी नेमका डोळा कुणाला मारला याबद्दल सांगता आलं असतं. त्यामुळे त्यांनी डोळा कुणाकडे बघून मारला त्याचा अर्थ काय हे अजित पवारचं सांगू शकतील अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

Tags

follow us