Download App

Letsupp Special : केसीआर उडवणार धमाका; 8 माजी आमदार पक्षात दाखल; आणखी 10 लागले गळाला

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव. तेलगंणावर भक्कम पकड असलेला नेता. स्वतःच्या राज्यात घट्ट पाय रोवल्यानंतर या नेत्याची नजर आता शेजारच्या महाराष्ट्र राज्यावर आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्रात राजकीय सक्रियता वाढवली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथे सभा घेऊन भारत राष्ट्र समितीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय 8 माजी आमदार आणि एका माजी खासदार महोदयांनाही त्यांनी पक्षाच्या गोटात दाखल करुन घेतलं आहे. नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. (NCP leader from Solapur district Bhagirath Bhalke and at least 10 former MLAs from the state are likely to join Bharat Rashtra Samiti)

भगीरथ भालके अन् 10 माजी आमदारही भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर?

अशात आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके आणि राज्यातील किमान 10 माजी आमदार भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या सर्व नेत्यांना पक्षात घेऊन केसीआर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमका करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भालकेंसह या 10 माजी आमदारांनी हैदराबाद दौरा केला.

केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याहून हैदराबाला येण्यासाठी पक्षाचे खास विमान पाठविले होते. याच विमानाने ते हैदराबादला रवाना झाले होते. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 10 माजी आमदार रस्ते मार्गेने केसीआर यांना भेटून आल्याची माहिती आहे.

एक पोलीस तोडणार भाजप-शिवसेना युती? शिंदेंचे काम न करण्याचा ठराव मंजूर

राज्यातील विशेषतः  कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे भारत राष्ट्र समिती आणि या माजी आमदारांमध्ये समन्वयाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या तरी या दौऱ्यात कोणाचाही प्रवेश झाला नाही. मात्र तरी केसीआर यांनी सर्वांना तेलंगणा मॉडेल समजावून सांगितले. तेलंगणातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर चर्चा झाली. आता या सर्वांचे आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या केसीआर यांच्या भव्य सभेत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राणे बंधू अन् राऊतांवर बंदी घाला; भाजपच्याच नेत्यानं राणेंना फटकारलं

यापूर्वी बीआरएसमध्ये दाखल झालेले माजी आमदार, खासदार अन् नेते :

उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी
यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम
ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे
माजी आमदार हर्षवर्धन जाधव
माजी आमदार शंकर धोंडगे
माजी आमदार नागनाथ घिसेवाड
माजी खासदार हरिभाऊ राठोड
माजी आमदार दीपक आत्राम

Tags

follow us