राणे बंधू अन् राऊतांवर बंदी घाला; भाजपच्याच नेत्यानं राणेंना फटकारलं

राणे बंधू अन् राऊतांवर बंदी घाला; भाजपच्याच नेत्यानं राणेंना फटकारलं

Sanjay Kakade : भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या ट्विटमुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या प्रकार संताप व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली. निलेश राणे (Nilesh Rane) यांचा सर्वच स्तरातून निषेध होत असताना आता भाजपच्याच माजी खासदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

निलेश राणे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेचा मी वैयक्तिक निषेध करतो. संजय राऊत, निलेश राणे, नितेश राणे यांच्यावर मीडियानेच बंदी घातली पाहिजे. संजय राऊत आणि राणेंकडे मीडियाने आजिबात जाऊ नये, असे आवाहन माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केले.

‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात

काकडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, मी स्वतः या प्रकारांबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाहा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहीणार आहे. शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीबाबत असे बोलल्याने आमच्या पक्षाची् प्रतिमाही खराब होत आहे. राणे जे काही बोलले असतील हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पक्षाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे काकडे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube