Download App

बारामतीत पवारांचे दोन्ही गट आमने-सामने? जयंत पाटलांनी सांगून टाकलं…

अजित पवार गट आता स्वंतत्र झालायं, त्यामुळे ते पक्षाची बांधणी करतीलच, त्यावर प्रश्नोत्तरे करणं अवघड असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघातून अजित पवार गट आणि खासदार सुप्रिया सुळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आता जयंत पाटलांनी यांनी या चर्चांवर शिक्कामोर्तबच केल्याचं दिसून येत आहे.

केंद्र सरकार निर्लज्जच, त्याहून अधिक निर्लज्ज राज्य सरकार; कांदा प्रश्नावरून रोहित पवार आक्रमक

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार गट आता स्वंतत्र झाला आहे, त्यांनी त्यांचा मार्ग अनुसरला आहे. त्यानूसार ते त्यांच्या गटाची बांधणी करत आहेत. त्यानूसार अजित पवार गट प्रत्येक मतदारसंघात काय करतात यावर प्रश्नोत्तरे करणं अवघड असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त

तसेच यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार गटाच्या धर्मनिरपेक्षतेवर बोट ठेवत उपरोधिक टीका केली आहे. अजित पवार गटाने धर्मनिरपेक्षता जपली तर आम्हाला आनंदच होईल, त्यांनी जर फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार त्यांनी सोडला नसेल तर ते कृतीतून दाखवतील असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत. भाजपसोबत जाण्याबाबत त्यांची काय अपरिर्यता आहे तेही ते सांगतील, असंही ते म्हणाले आहेत.

Ratan Tata : मुख्यमंत्र्यांकडून रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिलाच ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान

काय म्हणाले होते सुनिल तटकरे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून धर्मनिरपेक्षता हा या पक्षाचा मुख्य विचार राहिला असून राज्यामध्ये शिवसेना व भाजपसोबत गेल्यावरही आम्ही आमचा विचार सोडलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊनच महाराष्ट्राचा विकास करणार असल्याचं तटकरे म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीतला मोठा गट सत्तेत सामील झाल्यानंतर आता आगामी निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार गटाचंही मोठं आव्हान असणार आहे.

Tags

follow us