Jitendra Awhad on Ajit Pawar : बारामतीत (Baramati) एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे, दुसरा आमदार आला की, माझी किंमत तुम्हाला कळेल, असं वक्तव्य आज बारामतीमध्ये बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं ते बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी दिलेत, अशी चर्चा सुरू झाली. अजितदादांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं.
सावधान, देशात मंकीपॉक्सची एन्ट्री? संशयित रुग्णावर उपचार सुरु
जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. ते या कलेचा वापर करत आहेत. बारामती त्यांच्यामुळं उभी राहिली हे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. बारामती खऱ्या अर्थाने उभी राहिली ती पवारांमुळं, असं आव्हाड म्हणाले.
किती वेळा नवरे बदलले तू अन् कुणाला बोलतो?, चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देतांना खडसेंची जीभ घसरली
पुढं बोलताना आव्हाड म्हणाले की, अजित पवारांनी पक्ष हिसकाऊन घेतला. राजकीय करामती केल्या. एवढा पश्चाताप घर फोडल्याचा होत असेल तर जाऊन एकदा पत्रकारांना सांगा हा पक्ष मी शरद पवारांच्या घरातून चोरून आणला, आणि मी आता त्यांना देऊन टाकतो. मी माझी निशाणी घेऊन लढतो, असं आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्याविरुद्ध तक्रार करायचा नाही. तो त्यांना घाबरून नाही. ही तक्रार पवारांपर्यंत गेली तर ते पवार नाराज होतील, या भीतीने. आता तसं नाही. आता तिथं ना पवार साहेब आहेत आणि कोणी कोणाला घाबरत नाही, असं आव्हाड म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकास कामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत व्यक्त करत दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, असं वक्तव्य अजित पवारांनी केली.