Mehboob Shaikh On Sadabhau Khot : आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर बोलण्याची लायकी आहे का? या शब्दांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केलीयं. मारकडवाडी येथे आज भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागलीयं. यावेळी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावरुन शेख यांनी टीका केलीयं.
शरद पवार जन्म १०० शकुनी मेल्यावर झालाय; भाजप आमदार पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका
मेहबूब शेख म्हणाले, सदाभाऊ खोत हा कडकनाथ कोंबडी चोरणारा आणि हॉटेलची बिलं बुडवणारा माणूस आहे. एक आमदारकीचा तुकडा फेकला की, हा बोलायला लागलाय. शरद पवार यांच्यावर बोलण्याची याची लायकी आहे का? शरद पवार यांची राजकीय हत्या करणारा आणखी जन्माला यायचा आहे. सदाभाऊ खोत यांची तेवढी लायकी नाही. गोपीचंद पडळकर काय शंभर शकुनी वगैरे बोलतो. 2019 ला तिकीट मिळवण्यासाठी हा माणूस जयंत पाटील यांच्या पाठी फिरत होता. डिपॉझिट जप्त झालेल्या माणसाने शरद पवार यांच्यावर बोलू नये. मी तोंड उघडल तर यांचं फिरणं बंद होईल, अशी टीका शेख यांनी केलीयं.
वरुण धवनच्या बेबी जॉनचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘या’ तारखेला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
शरद पवार साहेब लई हुशार, साहेबांना आता झोप लागेना. 60 ते 70 वर्षे सत्ता भोगली. आता पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ आला. देवाभाऊचा नावाचा वस्ताद या मातीत आला. लोकशाही वाचवण्याचे काम या गावाने केले. शरद पवार यांचा पक्ष नसून गुंड आणि लुटारुंची टोळी आहे आणि ते गाडायचे काम देवाभाऊने केले, असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.
बांगलादेश दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन! भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
दरम्यान, मारकडवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते मंडळी भेट देत आहेत. नुकतीच शरद पवार यांनी या गावात सभा घेतली आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. तर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे मारकडवाडीत दाखल झालेत. या गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे ते काही शक्य झाले नाही. त्यानंतर आज जाहीर सभेतून सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल चढवला.