Download App

‘विधानसभा लढण्याची माझी तयारी, खडकवासल्यातून…’; रुपाली चाकणकरांचे मोठं विधान

अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं.

  • Written By: Last Updated:

Rupali Chakankar : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वेध लागले आहे. सर्वच पक्षांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. नेते आणि इच्छुक उमेदवारांनी त्या त्या मतदारसंगात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलं.

“भारताने वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार”; मंत्री विखेंना फुल कॉन्फिडन्स 

माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी असून खडकवासला मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे चाकणकर यांनी सांगितलं.

रुपाली चाकणकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेविषयी मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या, 2019 मध्ये मी खडकवासल्यातून उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं. लोकसभेत खडकवासल्यामधून मताधिक्य आहे. माझ्या मतदारसंघातून देखील सुनेत्रा पवार यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. मी खडकवासल्यातून लढण्यासठी इच्छुक आहे. पण, तरीही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे ते म्हणाले.

भारताचे लष्करप्रमुख बदलले, मनोज पांडेंच्या जागी उपेंद्र द्विवेदी; कशी आहे कारकीर्द? 

आव्हाडांना महत्व देण्याची गरज नाही…
जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहिण योजनेवरून अजित पवारांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे निवडणुकीत बाजूला ठेवलं होतं. त्यांच्या वक्तव्याला फारस महत्व देण्याची गरज नाही. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

यासोबतच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्यांचं प्रस्थान झालं. या वारीत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांवर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्यवारी अभियान उपक्रम राबविण्यात आला आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोयीसुविधा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलं जातं, असं त्या म्हणाल्या.

follow us