राजभवनात असताना शपथविधीनंतर राजकारणातील नैतिकता अन् विश्वासार्हतेचं काय होणार? हा प्रश्न माझ्या मनात आला त्यानंतर आज मी शरद पवारांसोबत ठामपणे उभा असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज शरद पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हे बोलत होते. विशेष म्हणजे आजच मुंबईतील एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचीही बैठक पार पडत आहे.
संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची भूमिका वेगळी का?, ठाकरे गटाच्या भूमिकेवर राणेंचा सवाल…
–#SanjayRaut #adityathackrey #thackeraygat #letsuppmarathi #MaharashtraPolitics https://t.co/NgkOp5Jpo6— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 5, 2023
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, शिवरायांच्या स्वराज्यात अफजल खानही असाच आला होता. त्यानेही धमक्या दिल्या की, जर आमच्यात सामील झाले नाहीत तर जमिनींवर घरांवर नांगर फिरवला जाईल,त्याने अनेक फर्मान सोडली होती. कान्होजी जेधे म्हणाले, फर्मानांची काय परवा तुमच्यासाठी वतनांवर पाणी सोडायला तयार असल्याचं म्हटलं होतं हाच महाराष्ट्राच्या इतिहास आहे. हा इतिहास वतनांवर पाणी सोडणाऱ्यांचा असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
‘भेट घेतली, कानमंत्र मिळाला’; शरद पवारांनी फेटाळला खासदार कोल्हेंचा राजीनामा
तसेच रविवारी घडलं राजभवनात जे घडलं ते अनेकदा देशात घडलं आहे. असं वारंवार घडतंय, मध्य प्रदेश कर्नाटकातही हे घडलंय, असं घडलंय म्हणून रडत बसणाऱे आम्ही नाहीत तर का घडलं म्हणून विचार करणारे आम्ही आहोत. शॉर्टकटने पाहोचू हे अमिष असतं तर पुढे पकडले जाऊ हा धोका असतो, अशी टीकाही कोल्हेंनी केली आहे. अमिष, धोका सोडून जे या वाटेवर राहतात त्यांच्याकडे तत्वे अन् नैतिकता असते, असंही ते म्हणाले.
Central Bank of India मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 1000 पदांची भरती, पगार 48000 रुपये
रविवारच्या दिवशी मी स्वत: राजभवनात होतो. तिथूनच पहिला फोन करुन सांगितलं की मला राजीनामा द्यायचा आहे. असं झालं तर राजकाणातील नैतिकता विश्वासार्हतेचं काय होणार? हा प्रश्न माझ्या मनात होता त्यानंतर आज मी पवारांसोबत ठामपणे उभा असल्याचं कोल्हेंनी ठामपणे सांगितलं आहे. दरम्यान, लोकशाहीवरचा विश्वास टिकावं, असं वाटत असेल तर शरद पवारांच्या सोबतीनेच होऊ शकतं, असा विश्वासही खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह इतर अनेक पुन्हा परतीच्या वाटेवर आल्याचं दिसून आलं आहे. शपथविधीदरम्यान, अजित पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी हजेरी लावली.