Central Bank of India मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 1000 पदांची भरती, पगार 48000 रुपये

Central Bank of India मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 1000 पदांची भरती, पगार 48000 रुपये

Central Bank of India job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ही देशातील एक आघाडीची अग्रगण्य बॅंक आहे. या बॅंकेने मॅनेजर स्केल-२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीची अधिसुचना बॅंकेने प्रकाशित केल आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचा फॉर्म संस्थेच्या अधिकृत वेबसाईट centerbankofindia.co.in वर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार देय तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. (Golden Opportunity to Job in Central Bank of India Recruitment 1000 Posts Salary Rs 48000)

पदाचे नाव – मॅनेजर स्केल २

एकूण पदे – १०००
पदांचा तपशील
एससी – १५०, एसटी – ७५, ओबीसी – २७०, ईडब्ल्यूएस- १, जनरल – ४०५

नोकरीचे ठिकाण– भारतात कोठेही

शैक्षणिक पात्रता –
या भरतीमध्ये सहभागी होणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, उमेदवार CAIIB देखील उत्तीर्ण असावा.

ज्यांनी द्रोह केला, त्यांनी माझा फोटो वापरु नये; शरद पवारांनी अजितदादांना ठणकावलं 

वयोमर्यादा –
मॅनेजर स्केल-२ या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३१ मे २०२३ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अनुसुचित जाती, जमातींना वयात ५ वर्षाची सवलत आहे. तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना तीन वर्षाची सुट दिली जाणार आहे.

अनुभव-
उमेदवाराला कमीत कमी तीन वर्षाचा ऑफीसर पदावर काम करण्याचा अनुभव असावा.
किंवा
कमीत कमी ६ वर्षाचा क्लर्क पदाचा अनुभव असावा.

पगार – ४८१७०

अर्ज फी-
अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी अर्ज शुल्क जमा करणे आवश्यक आहे. फी भरल्याशिवाय सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. श्रेणीनुसार अर्जाचे शुल्क वेगळे ठरवले जाते.

SC, ST, PWBD आणि महिला वर्गासाठी अर्ज शुल्क जीएसटीसह 175 रुपये आहे
इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क जीएसटीसह रु.850 आहे

जाहिरात –
https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/_Notification%20_RECRUITMENT-OF-MANAGERS-IN-MMGS-II-IN-MAINSTREAM.pdf

तुम्ही अर्ज कसा करू शकता?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मॅनेजर रिक्रूटमेंट 2023 साठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आता तुम्हाला या भरती संदर्भातील लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता एक नवीन वेबसाइट ibpsonline.ibps.in/cbimmjun23 दिसेल. या वेबसाइटवर click here for new registration या पर्यावावर क्लिक करा आणि आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ – centerbankofindia.co.in

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube