सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना पुणेरी टोमणा; म्हणाल्या, अशाने दरवेळेस कोणी…

Supriya Sule On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास शैलीत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपची काल पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रेदश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T132250.391

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 19T132250.391

Supriya Sule On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास शैलीत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपची काल पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रेदश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा आधार घेतला होता. यावर आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे.

टीआरपी कसा वाढवायचा हे तुम्ही शरद पवारांकडून शिका असे फडणवीस म्हणाले. हा शरद पवारांना टोला नसून त्यांना कॉम्पलिमेंट दिली असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या  कार्यकर्त्यांना सांगितलं की शरद पवारांकडून टीआरपी कसा वाढवायचा हे शिका, असा त्यांच्या वक्तव्याचा मी अर्थ काढला आहे, असे सुळे म्हणाल्या.

अंधारेंची दादागिरी! सोफा, पैशांची मागणी अन् बरचं काही; आप्पासाहेबांकडून आरोपांची माळ

तसेच ते पुस्तक जर सर्वांनी व्यवस्थित वाचलं तर 100 मुद्दे असे आहेत की ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचे कौतुक आहे. त्यामुळं हा फक्त सिलेक्टिवपणा आहे. काही वाचायचं नाही, कोणीतरी नोट्स काढून देतो आणि ते वाचतात. अशाने कोणी तरी दरवेळेस पास होत नाही. त्यासाठी पूर्ण पुस्तक वाचायचं असतं, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

दरम्यान,  मीच माझा राजीनामा माझ्या पक्षा कडे देतो. माझा पक्ष ठराव करेल, माझं राजीनामा माझ्याकडे परत येईल. शरद पवार यांनी राजीनामा देतो म्हणन आणि देणं यातला फरक पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनाम्यातील  फरक समजून सांगितला, असे म्हणत फडणवीसांनी काल शरद पवार व उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.

Exit mobile version