अंधारेंची दादागिरी! सोफा, पैशांची मागणी अन् बरचं काही; आप्पासाहेबांकडून आरोपांची माळ

अंधारेंची दादागिरी! सोफा, पैशांची मागणी अन् बरचं काही; आप्पासाहेबांकडून आरोपांची माळ

बीड : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांना बीडमध्ये मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बीडचे (Beed) बडतर्फ जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट करुन आपण अंधारे यांना दोन कानशिलात लगावल्या असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर दादागिरी करत असल्याचे आणि पदाधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याचे अनेक खळबळजनक आरोप केले.  दरम्यान, या सर्व प्रकारानंतर जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Shivsena (UBT) vs Sushama Andhare vs Appasaheb Jadhav conflict)

जाधव यांनी व्हिडीओमध्ये काय म्हंटलं?

आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या.

‘सुषमा आक्कांचं जिकडं राशन तिकडं भाषण’; शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंची सडकून टीका

अंधारे सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, फर्निचर, सोफ्यासाठी त्या पैसे मागत आहेत. त्या माझं पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी रात्र अन् दिवस मेहनत करत आहे, रक्ताच पाणी करत आहे, हाडाची काडं करत आहे. माझ्या लेका-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करुन पक्ष वाढवत आहे. पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. यातूनच सुषमाताई अंधारे आणि माझ्यात बाचाबाची झाली. याच वादातून मी त्यांना दोन चापटा मारल्या, अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली.

Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

घडलेल्या प्रकारावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे यांनी ही शिंदे गटाची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मी सुखरुप आहे. पण घटनाक्रम सांगणं गरजेचं आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्समध्ये 20 मे रोजी आपली सभा होणार आहे. यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सभेच्या ठिकाणी पाहणीसाठी गेलो होतो. यावेळी सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला.  आप्पासाहेबांची भाषा उर्मट आणि अत्यंत खालच्या पातळीवरील होती. त्यानंतर जाधव तेथून निघून गेले.

मात्र जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचली आहे. तसेच आप्पासाहेब जाधव हे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या अगोदरच्या सभेला लोकांची गर्दी जमवता आली नव्हती. मात्र मी एक महिला असूनही एक प्रबोधन यात्रा यशस्वी करून दाखवली याची सल त्यांना असेल. आता त्यांना काय उत्तर द्यायचं या उद्विगणतेतून त्यांनी मला मारहाण झाल्याचा दावा केला असल्याचं सुषमा अंधारे म्हाणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube