‘सुषमा आक्कांचं जिकडं राशन तिकडं भाषण’; शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंची सडकून टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T120948.349

Sushma Andhare Vs Jyoti Waghamare :  शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल ठाकरे गटाचे बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आमच्याकडे सोफा, फ्रीज, फर्निचर, एसी याची मागणी केल्याचा आरोप जाधव यांना केला. तसेच माझे त्यांच्यासोबत वाद झाल्याने मी त्यांना दोन चापट्या हाणल्या, असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी यावरुन सुषमा अंधारेंना सुनावले आहे.

बीड जिल्ह्यात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत झालेला मारहाणीचा प्रकार धक्कादायक आहे. कोणत्याही महिलेसोबत असा प्रकार होणं हे निंदनीय आहे. पण ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काय सुषमा आक्का बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, असा प्रश्न वाघमारे यांनी अंधारेंना विचारला आहे.

तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेता, पदांची विक्री करता, दादागिरी करता. तुमच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून एसी बसवून घेता, सोफा घेता, फर्निचर बसवून घेता. शेतकऱ्यांच्या पोटचा घास काढून तुम्हाला पैसे द्यावे लागता हे खरं आहे का, असे म्हणत वाघमारे यांनाी अंधारेंना सुनावले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाप्रबोधन यात्रा काढून सगळ्यांवर चिखलफेक केली. बाकी सगळे भ्रष्ट अन् मीच कशी धुतल्या तांदळासारखी आहे ,हे दाखवले. पण तुमचेही पाय मातीचे निघाले, अशा शब्दात त्यांनी अंधारेंवर निशाणा साधला आहे.

आरपीआय ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी हा जो तुमचा प्रवास झाला आहे, तो जिकडं राशन तिकडं भाषण असं तुमचं वागणं असतं हे लोक म्हणतात, ते खरं आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे तुमची ही प्रबोधन यात्रा आहे की, प्रबो’धन’ यात्रा आहे, असे म्हणत त्यांनी अंधारेंना सुनावले आहे.

Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

Tags

follow us