Supriya Sule : राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खासदारांना अपात्र करा (NCP Crisis) अशी मागणी दोन्ही गटांनी केली आहे. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार गटावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांना अंधारात ठेऊन शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपासोबत आमची वैचारिक लढाई आहे. प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने निर्णय घेत असतील म्हणून आम्ही त्यांना जुलै महिन्यातच अपात्र केलं. केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेते तेव्हा पटेल मात्र त्यांच्या बाजूने निर्णय घेतात. त्यामुळेच आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी पुन्हा केली आहे.
Supriya Sule : आक्रमक भाषणाची मावशीनेच आईकडे तक्रार केली..
शरद पवार यांना अंधारात ठेऊन आम्ही शपथ घेतली. हे तुमच्या रेकॉर्डवर आहे. पक्षाच्या अध्यक्षाची माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अपात्रतेची कारवाई झालीच पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याच्या मागणीच्या यादीतून नाव वगळल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर विचारले असता सुप्रिया सुळे यांनी मला माहिती नाही या एकाच वाक्यात उत्तर देत या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले.
राज्यसभेत राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. यामध्ये शरद पवार, वंदना चव्हाण, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर जेव्हा चर्चेत भाग घेण्याची वेळ आली तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी भाजप आणि मणिपुरातील सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली, असे सुळे म्हणाल्या.
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा.. सुप्रिया सुळेंनी धमकावूनच सांगितलं
फडणवीस-गडकरींबद्दल मला सहानुभूती
मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते कारण दिल्लीतल्या अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्धवस्त करण्याचं काम करत आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असोत सगळ्यांना कमकुवत कसं करता येईल, हे पाहिले जात आहे. हे मी हवेत बोलत नाही तर माझ्याकडे पुरावेही आहेत मी माझं म्हणणं सिद्ध करू शकते, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.