Supriya Sule : ‘आक्रमक भाषणाची मावशीनेच आईकडे तक्रार केली’

Supriya Sule : ‘आक्रमक भाषणाची मावशीनेच आईकडे तक्रार केली’

Supriya Sule : राष्ट्रवादीच उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याकडे पाहिलं जात आहे. कारण अजित पवार गटाने राष्ट्रवादीशी(NCP) फारकत घेतल्यानंतर आता शरद पवार गटाकडून(Sharad Pawar Group) सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करताना दिसताहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भाषणाची सर्वत्रच चर्चा रंगत असते.

आक्रमक भाषणासंबंधी आज सुप्रिया सुळे यांनी एक किस्सा शेअर केला आहे. माझ्या आक्रमक भाषणामुळे मावशीने थेट आईला फोन करुन तक्रार केली असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे, पण मी जे करते ते खरं करते खोटे आपल्याला जमत नसल्याचं सुळेंनी सांगितलं आहे. आक्रमक भाषणांमुळे आईला फोन करुन मावशीने तक्रार केलीयं. सुप्रिया सुळे यांना तीन मावशा आहेत. गिता, सुनिता आणि सुलेखा अशी त्यांची नावे असून नेमक्या कोणत्या मावशीने फोन करुन तक्रार केली, याबाबत सुप्रिया यांनी खुलासा केलेला नाही. पुण्यातील आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.

सचिनची लेक अन् रश्मिका ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं ठिकठिकाणी आयोजन केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार आदी नेते हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतयं. याच मेळाव्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीतल्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली आहे. एवढचं नाहीतर आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत केलं नाहीतर सुप्रिया सुळे नाव सांगणार नसल्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे सुळेंच्या या आक्रमक भाषणाने मेळावा चांगलाच दणाणून गेल्याचं दिसून आलं.

Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’च्या पोस्टरचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण

सुप्रिया सुळे मेळाव्यात म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या चिन्हांची लढाई काय होईल, अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही, पण आगामी निवडणुकीत अदृश्य शक्तीला चीत केलं नाहीतर सुप्रिया सुळे नाव सांगणार नसल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच 2013/14 साली लोक सत्ता असताना आपल्याला नाकारत होते. तेव्हा भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आज ना खाऊंगा ना खाने दुंगाचे काय झालं? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महागाईवरुन हल्लाबोल :
देशात आज महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुधाला, ऊसाला, कांद्याला हमीभाव नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केलं. विकास झाला पण यांचा झाला यांचे सगळे वाढले पण सर्वसामान्य लोकांना काय मिळाले. मला वाटलं होतं सगळं संपले पण लढायला मजा येते. माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही. बर झाला मला चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केलं गल्लत होते असे आज होताना दिसत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे आपल्या आक्रमक भाषणाने नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सुळे यांना खासदार पदावर उत्कृष्ट काम केल्याची पावती म्हणून संसदरत्न पुरस्कारानेही सन्मान्मित करण्यात आलं होतं. अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकासह इतर अनेक विधेयकांच्या प्रस्तावावर सुळे यांनी आपल्या भाषणाची छाप पाडलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube