भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवो; अजितदादांच्या मागणीला सुप्रियाताईंचे समर्थन

Supriya Sule On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखदी जबाबदारी द्या, असे वक्तव्य केले. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे […]

Letsupp Image   2023 06 22T153733.453

Letsupp Image 2023 06 22T153733.453

Supriya Sule On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखदी जबाबदारी द्या, असे वक्तव्य केले. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे काल म्हटले होते.

अजित पवार यांची ही मागणी म्हणजे ते आता अप्रत्यक्षरित्या नाहीतर थेटपणे संघटनेची सुत्रे स्वत:कडे घेण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याची प्रतिकिया व्यक्त होते आहे. आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजितदादांना पुढे यायचे नाही ना, अशी चर्चा त्यांच्या भाषणातनंतर रंगली आहे.

अजितदादा बोलले पण, भुजबळांनीच प्रदेशाध्यक्षपदावर ठोकला दावा; सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी देखील यासंदर्भात वक्तव्य केले.  अर्थातच एका बहिणीला एका भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, असेच वाटणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही एक संघटना आहे. संघटनेतील सर्व लोक आनंदी रहावे असे वाटणार. तसेच त्यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यायचे की  नाही, हा पक्षाचा निर्णय आहे. पण ते कायमच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतात, असे सुळे म्हणाल्या. याआधी देखील त्यांनी अजितदादांचे कौतुक केले होते. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे त्यांनी म्हटले होते.

लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

दरम्यान,  छगन भुजबळ यांनीही या सर्वांवर भाष्य केले असून त्यांच्या वक्तव्यातून प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा ठोकल्याचे स्पष्ट होत आहे. आपण ज्यावेळी ओबीसी,ओबीसी म्हणतो. त्यावेळी मला असं वाटतं की ओबीसींबद्दल नुसतेच बोलून चालणार नाही तर महत्वाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहेत. म्हणजे तटकरे आहेत धनंजय मुंडे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करीन, अशा शब्दांत भुजबळ यांनी आपणही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले.

Exit mobile version