Supriya Sule On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन चांगलीच टोलेबाजी केली आहे. कालच्या जाहिरातीनंतर आज वृत्तपत्रांमध्ये दुसरी जाहिरात छापून आली आहे. पण यावर आता विरोधकांकडून टोलेबाजी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी टोलेबाजी केली आहे.
42 टक्के लोक त्यांच्या बाजूने आहेत याचा अर्थ जास्त लोक त्यांच्या विरोधात आहे. तसेच सर्व्हे कोणी केलाय आणि सर्व्हेची साईज काय आहे हे देखील माहित नाही. तसेच मी त्या हितचिंतकाच्या शोधात आहे की ज्याने कोट्यवधी रुपये खर्च करुन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली. तसेच आजच्या जाहिरातीचे डिजाईन हे दिल्लीवरुन आलं असावं असा टोला त्यांनी लगावला आहे.
Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!
राज्यामध्ये यांचे सरकार येऊन 1 वर्ष झाले. गेल्या 1 वर्षामध्ये या सरकारने काहीही केले नाही. शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न झाला पण उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आलेले नाहीत. या जाहिरातीमधून देवेंद्रजींचा अपमान झाला आहे. देवेंद्रजी आमचे विरोधक असले तरी त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. फूल पेज जाहिरात देऊन संपूर्ण राज्यभर शिंदे आणि त्यांच्या गटाने देवेंद्रजींचा जो अपमान केलाय तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे. ज्या 105 आमदारांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झाला त्यांच्या नेत्याला अपमानित करण्यात काय मजा येते ते माहित नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांची बाजू घेतली आहे.
फडणवीस यांनी आजचे कार्यक्रम रद्द केल्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. एवढा जर अपमान मुख्यमंत्री देवेंद्रजींचा करणार असतील तर त्यांनी कार्यक्रमाला का जावं, असं त्या म्हणाल्या. एकंदरितच शिवसेनेच्या जाहिरातीवरुन आता विरोधक देखील सत्ताधाऱ्यांना सुनावताना दिसत आहे.