Download App

राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…

एकनाथ शिंदेंच्या बंडादम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

“आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला

पटेल म्हणाले, मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह बंड केलं होतं. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या अस्थिरतेमुळे राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याती भूमिका मांडली होती. यासंदर्भातलं पत्रच शऱद पवारांना लिहिलं असल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

MPSC कडून PSI 2020 चा निकाल जाहीर; तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित

राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत युती करण्याची भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरलं होतं. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी संधी साधत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री झाले, दरम्यान,त्यावेळी भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरु असल्याचाही गौप्यस्फोट पटेल यांनी केला आहे.

अजितदादांची हाक अन् तनपुरेंची ‘देवगिरी’वर धाव; दादांनंतर मामांनाही भेटणार

एवढंच नाहीतर प्रफुल्ल सांगताहेत ते खरं असल्याचं म्हणत या गौप्यस्फोटाला जितेंद्र आमदारांनीही दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालंय. आमदारांचं भाजपसोबत जाण्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांकडे दिलं नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथे शक्ती स्थळावर घेतले दर्शन, पाहा फोटो

‘हे पत्र जयंत पाटील यांच्या हातात देण्यात आलं होतं, ते पत्र जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवारांना दिलंच नाही. कारण जयंत पाटील यांना माहिती होतं की, शरद पवारांना किती वाईट वाटेल. शरद पवारांना एकटं सोडा, आपण जाऊया, असं काही आमदारांचं म्हणणं होतं. शरद पवारांना एकटं राहू द्या, जाऊ आपण, असं आमदार दिलीप बनकर म्हणाले होते. तेव्हा जयंत पाटील ढसाढसा रडले होते’, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांची बंडखोरी, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

‘माझीही सही त्या आमदारांमध्ये होती. मीच जयंत पाटील यांना सांगितलं होतं मी जाणार नाही, पण इथे काही नाही म्हणता येत नाही. नंतर जयंत पाटील यांनीच सांगितलं हे पत्र मी शरद पवारांना देणार नाही’, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 24 तासात हे घडलं होतं, जवळपास सर्वच आमदारांच्या सह्या या पत्रावर होत्या, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us