MPSC कडून PSI 2020 चा निकाल जाहीर; तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित

MPSC कडून PSI 2020 चा निकाल जाहीर; तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित

Maharashtra Public Service Commission result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 2020 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या घेतलेल्या परिक्षेचा निकाल तब्बल तीन वर्षानंतर लागला आहे. अनेक कारणांमुळं हा निकाल एमपीएससीने राखून ठेवला होता. निकाल लागत नसल्याने परिक्षार्थ्यांचीही मोठी नाराजी होती. या विद्यार्थ्यांनी ही बाब आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली होती. बच्चू कडू यांनी या संदर्भात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी या परीक्षेच्या निकाल संदर्भात चर्चा केली होती. दरम्यान, आज अखेर एमपीसएसीने 2020 मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेचा निकाल लावला. (MPSC Announces PSI Result 2020 Provisional quality list published on website)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020 पोलिस उपनिरीक्षक’ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण ६५० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. तात्पुरती गुणवत्ता यादी ही EWS श्रेणीसाठी राखीव असलेल्या 65 पदांचा निकाल राखून ठेवून आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोना काळापासून रखडलेला निकाल आता तीन वर्षानंतर लागल्यानं परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Photo’s : उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मंत्रालयात; मंत्रिमंडळ बैठकही पार पडली

क्रमवारीत अव्वल सहा उमेदवार खालीलप्रमाणे-

खचकड सुनील भगवान ४२७ गुणांसह उत्तीर्ण
भोसले निर्मलकुमार सूर्यकांत ४२५.५० गुण
आढाव गणेश दत्तात्रय ४२५ गुण
काकरवल साईनाथ रामधन ४२४.५० गुण
शुभम केशव बकाल ४२३ गुण

भाले अजयसिंह बाबासो ४२३ गुण

उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या पदांची निवड करण्याचा किंवा निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. ही सुविधा एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in वर 5 जुलै 2023 पासून दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि 11 जुलै 2023 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना पदांची निवड करता येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube