Maharashtra Political Crisis: अजित पवारांची बंडखोरी, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

  • Written By: Published:
Working President Supriya Sule will take decision of Ajit Pawar roll in ncp

Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit pawar) भाजप-शिंदे सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (supriya sule) तर राष्ट्रवादीवर दावा देखील केला आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू केली होती, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या बाजूला आमदार रोहित पवार हे चित्र दिसून आले आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नाहीतर थेट पवार घराण्यात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असं चित्र निर्माण झाले आहे. यावर आता सुप्रियाताई सुळे यांची काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नातं आणि काम यामध्ये आता मी गल्लत करणार नाही असंही त्या म्हणाल्या. अजित पवारांवर बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं दिसून आलं. ‘१९८०ची पुनरावृत्ती होणार की नाही हे काळच ठरवेल’, तसेच नवा मार्ग काढू सर्व नव्याने करू तर नातं आणि काम यामध्ये आता मी गल्लत करणार नाही असंही त्या म्हणाल्या आहेत, अजित पवारांबद्दल माझ्या मनात कायम प्रेम राहणार आहे. तसेच अजित पवारांविषयी बोलत असताना सुप्रिया सुळे भावुक झाल्याचे देखील दिसून आले आहेत.

अजितदादा, छगन भुजबळ यांच्या फोटोला काळे फासले…..पण आव्हाड यांनी….

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब हे आमच्या पक्षाचा मोठा चेहरा आहे. त्यांची साताऱ्यातील पावसातील सभा आणि आजची पत्रकार परिषद ही त्यांचा आत्मविश्वास दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून माझे एक कुटुंब आहे, पवार साहेबांनी सर्वांना एका बापाचं प्रेम दिले आहे. आज जे काही घटना घडली ती अतिशय वाईट घटना घडली आहे. परंतु आता आता नवा मार्ग काढू सर्व नव्याने करू अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे….

Tags

follow us