अजितदादा, छगन भुजबळ यांच्या फोटोला काळे फासले…..पण आव्हाड यांनी….

अजितदादा, छगन भुजबळ यांच्या फोटोला काळे फासले…..पण आव्हाड यांनी….

Maharashtra Politics Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आहे. या घटनेच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यालयातील वातावरण चांगलेच तापले आहे.

मुंबईतील पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले असे करू नका आणि त्या फोटो फ्रेमची काळी शाई देखील पुसली आहे. महाराष्ट्रात आज अजित पवार यांच्या नेतृत्त्वातखालील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते चांगलंच आक्रमक झाले आणि त्यांनी सुनिल तटकरे आणि छगन भुजबळांच्या फोटोला काळं फासलं. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधामध्ये चांगलीच घोषणाबाजी केली आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आणि कार्यकर्त्यांनी फोटोंना लावलेलं काळं जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः पुसलं आणि ते फोटो पुन्हा भिंतीवर लावण्यात आले आहेत. या दरम्यान मात्र चांगलंच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube