Download App

Amol Mitkari : ‘2024 ला अजितदादाच CM’; मिटकरींनी बावनकुळेंना सांगितलं गणित

Amol Mitkari : पाच राज्यांच्या निवडणुकीतील प्रचंड यशानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा (Election Results 2023) कॉन्फिडन्स प्रचंड वाढला आहे. या उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून अशी काही वक्तव्ये केली जात आहेत की ज्यामुळे त्यांचे मित्रपक्ष अस्वस्थ झाले आहेत. आताही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य भंडारा येथे केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल  मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल मिटकरी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर मिटकरी म्हणाले, तीन राज्यांतील भाजपाच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची कॉन्फिडन्स लेव्हल वाढणं सहाजिकच आहे. जशी त्यांनी भंडारा येथे शपथ दिली तशी आम्हीही शपथ घेतली आहे की 2024 मध्ये अजितदादाच मुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून ही माझी भावना आहे. भारतीय जनता पार्टीचा म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री असावेत ही त्यांची भावना आहे. पण, लोकशाहीत या भावनेला अर्थ नसतो.

Mizoram Election 2023 : मिझोराममध्ये सुरूवातीच्या मतमोजणीत ZPM ची दमदार कामगिरी, MNF चा सुफडा साफ

ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री 

लोकशाहीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा त्या पदावर दावा असतो. आम्हाला विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीत ज्या जागांची मागणी अजितदादा एनडीएकडे करतील त्या सर्व जागा जिंकायच्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी सर्वानुमते जे काही ठरेल त्यानुसार निवडणूक लढायची. राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे. जसा बावनकुळेंचा संकल्प आहे तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आमचा संकल्प आहे की झोकून देऊन काम करू आणि 2024-29 ला अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, वानखेडे स्टेडियमवरच शपथ घेतील.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला तरी राष्ट्रवादी काँग्रेस दोन नंबरवर होता. आता ग्रामीण भागातील जनताच काय ते ठरवेल. पण मला कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे की 2024 रोजी अजितदादाच मुख्यमंत्री असतील हे फक्त शब्दाच्या भरवशावर नाही. यासाठी जास्त मेहनत करावी लागणार असून यासाठी आमची तयारी आहे.

Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला ?

राऊतांच्या बकवास गोष्टींना किंमत नाही 

संजय राऊत यांनी चार राज्यांच्या निवडणुकीआधी पीएम मोदींची जादू चालणार नाही, भाजप पराभूत होणार अशी भाकितं केली होती. शेवटी त्यांच्या भविष्यवाणीचे काय धिंडवडे निघाले हे जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. त्यांनी महाराष्ट्राबाबत भविष्यवाणी करणं हे कार्यकर्त्यांना दिलासा देण्याला ठिक आहे पण या चार राज्यांच्या निवडणुकीवरून एकंदरीत लक्षात येतं की या यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढणं सहाजिकच आहे. हा वाढलेला कॉन्फिडन्स पाहिल्यानंतर राऊतांचा कॉन्फिडन्स खाली जाणं सहाजिकच आहे. त्यामुळे त्यांच्या बकवास गोष्टींना आता कुठेही किंमत राहिलेली नाही.

Tags

follow us

वेब स्टोरीज