भ्रष्टाचारमुळे महसूल अधिकारी गर्भश्रीमंत; राष्ट्रवादीच्या आमदाराने विखेंना सुनावले

शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी काल विधानसभेत जोरदार भाषण केले आहे. मतदारसंघातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महसूल खात्यातील अनेक अधिकारी मनमानी कारभार करतात, असे ते म्हणाले आहेत. पुनर्वसन या विषयामध्ये पुणे जिल्हात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक मोक्याच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 21T132237.223

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 21T132237.223

शिरुर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी काल विधानसभेत जोरदार भाषण केले आहे. मतदारसंघातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महसूल खात्यातील अनेक अधिकारी मनमानी कारभार करतात, असे ते म्हणाले आहेत.

पुनर्वसन या विषयामध्ये पुणे जिल्हात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. अनेक मोक्याच्या जमिनी एजंटांनी मिळवल्या आहेत. ज्यांना लाभ व्हायला पाहिजे त्यांना लाभ झाला नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे.  काहींना गट नंबर टाकून त्यांना ते जमिनीचे क्षेत्र देण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला आहे. फक्त धनदांडग्यांना याचा लाभ झाला आहे. या अशा प्रकरणामुळे उरळी-कांचन येथील जमिनीच्या विषयाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयपर्यंत गेला आहे.

खासदार सुजय विखेंची माणुसकी! रस्त्यात बंद पडलेल्या कारला स्वत: दिला धक्का…

10 गुंठ्यामध्ये 10 लोकांची नावे टाकून हे खरेदी करतात. या सर्व प्रकरणामध्ये अधिकारी हे पैसे खातात. गरिबांना मात्र न्याय दिला जात नाही. अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे काम करतात. शिरुरला 4 महिन्यांपासून आमदार नाही. एक तहसिलदार येतो काही दिवस थांबतो मग त्याची बदली होते, असे पवार विधानसभेत म्हणाले आहेत.

‘लव्ह जिहादचा’ वाद पेटणार?; पत्रकार परिषदेत व्हिडिओ सादर करत नितेश राणेंचे खळबळजनक खुलासे

जमिनीच्या मोजणी करताना देखील अनेक अडचणी आहेत. अतितातडची मोजणी मागितली तरी त्याला अनेक दिवस लागतात. त्यामुळे या खात्यात देखील अनेक बदल होण्याची गरज आहे. वाघोली येथे महसूल खात्याचा अनेक जागा आहेत. त्याठिकाणी अनधिकृत टपरी टाकून धनदांडगा 50 हजार रुपये भाडे मिळवतो. यावर कारवाई झाली पाहिजे, असे अशोक पवार म्हणाले आहेत.

Exit mobile version