Download App

…तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांकडून चिमटा

अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.

Jayant Patil : सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलंय. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच सोलापुरात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा पार पडली. या सभेनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदावरुन चिमटा काढलायं. अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते पंढरपुरात बोलत होते.

छगन भुजबळ तुला चष्मा उचलना…तलवार कधी उचलायची; जरांगेंची खोचक टोलेबाजी

जयंत पाटील म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला नसता तर ते महाविकास आघाडकडून आज मुख्यमंत्री झाले असते, त्यांना सोईचंच झालं असतं पक्ष सोडला नसता तर झाले असते, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिला जात असल्याची चर्चा आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरी राष्ट्रवादीचेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्याबद्दल असं विधान केलं आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय चित्र पाहायला मिळणार हे गुलदस्त्यातच आहे.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी; आयुक्तांनी १३ जणांना दाखवला घरचा रस्ता, 3 पोलिसही निलंबित

तसेच मराठा आरक्षणाबाबत आम्ही आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यानंतर सरकारनेही दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा केली. मात्र या आंदोलकांना नेमकं काय आश्वासन दिलं, हे सरकार सांगत नाही. त्यामुळे सरकारने आता निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे,” अशी भूमिका जयंत पाटलांनी मांडलीयं.

काय म्हणाले होते अजितदादा?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांना तुम्ही इतके इतके आमदार आणल्यानंतर तुम्हाला मुख्यमंंत्री करतो असं सांगितलं तेव्हाच मला सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय…शेवटी हा नशिबाचा भाग असतो. देवेंद्र फडणवीस यांची 1999 ला टर्म सुरु झाली तर एकनाथ शिंदे यांची 2000 ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत मी सिनिअर आहे. माझी सुरुवात 1990 पासून झालीयं, तरीही मी मागे राहिलो जर मला संधी दिली असतील तर मी पूर्ण पार्टीच आणली असती, त्यांनी फक्त आमदारच आणले, असं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘योद्धा कर्मयोगी’ पुस्तक प्रकाश सोहळ्यादरम्यान भाष्य केलं होतं.

follow us