Download App

‘बीड जाळपोळ घटनेची एसपींना पूर्वकल्पना होती’; जयंत पाटलांनी सांगितली आतली माहिती

Jayant Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये जाळपोळचा प्रकार घडणार असल्याची पूर्वकल्पना पोलिस अधीक्षकांनी (Beed Sp) होती, तरीही त्यांनी हलगर्जीपणा केल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. दरम्यान, बीड जाळपोळ प्रकरणावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जयंत पाटलांनी ही आतली माहिती माझ्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी

जयंत पाटील म्हणाले, हा प्रकार घडणार याची पूर्वकल्पना बीडच्या एसपींना होती. त्यामध्ये एसपींकडून हलगर्जीपणा करण्यात आला आहे. आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरच्या फुटेजमध्ये सर्व काही दिसत आहे. प्रकाश सोळंके यांचं घर जाळल्यानंतर लोकांनी शहरात जाळपोळच्या घटना घडवून आणल्या त्यावेळी बीडचे पोलिस अधीक्षकांनी शहरात फिरण्याचे कष्ट घेतले नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

Box Office: ‘अ‍ॅनिमल’नं केली छप्पर फाड कमाई; जाणून घ्या 14 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

तसेच संदीप क्षीरसागर यांच्या घरीही लोकांनी जाळपोळ केल्यानंतर मी स्वत: बीडच्या डीएसपींना अनेकदा फोन केला होता. मात्र, त्यांनी माझा फोन घेतला नसून टेक्स मेसेज केला होता. त्यानंतर मी आयजींना संपर्क केल्यानंतर त्यांनी माझा फोन घेतल्यानंतर पुढील कारवाई सुरु झाली होती. घरासमोर पोलिस मुख्यालय असूनही आपण संरक्षण देऊ शकत नाहीत का? असा सवालही जयंत पाटलांनी यावेळी केला आहे.

सभागृहात उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की पोलिसांचा फौजफाटा कमी होता, मात्र प्रत्येक घटनेत पोलिसांची संख्या ही कमीच असते. जाळपोळच्या घटना घडत असताना पोलिसांनी हवेत फायरिंग का नाही केली? प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच, मात्र पोलिसांनी फायरिंग नाही केली असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

‘ती ऑडिओ क्लिप खोटी, फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करणार…’; बबनराव लोणीकरांचा खुलासा

राष्ट्रवादीचं कार्यालय जाळलं. जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, शिवाजी पंडीत, संदीप क्षीरसागरचं घरं जाळण्यात आलं. या लोकांना नंबर देण्यात आलेले होते. गोपनीय शाखेला या घटनेची पूर्ण माहिती होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, अद्याप एसआयटी गठीत करण्यात आलेली नाही, नेमकं पालकमंत्र्यांच्या मनात काय? असा सवालही जयंत पाटलांनी केला आहे.

जाळपोळचं कनेक्शन पप्पु शिंदेशी…
पप्पु शिंदे नामक एक कोऑर्डिनेटर आहे. हा एका राजकीय नेत्याचा भाचा आहे. पप्पु शिंदे हा या गॅंगचा नैपत्य करतोयं. पप्पु शिंदेचे लागेबांधे कोणाशी आहे? ते जाहीरपणे सांगून टाका,. आम्हांला माहित आहे. फडणवीसांनी खाजगीत सांगितलं तरी चालेल आम्हाला माहित असून पोलिसांना हे सराईत गुन्हेगार दिसत नव्हते का पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम का नाही केला. पोलिस आता मागे हात धरुन बघ्याची भूमिका घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us