Box Office: ‘अ‍ॅनिमल’नं केली छप्पर फाड कमाई; जाणून घ्या 14 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Box Office: ‘अ‍ॅनिमल’नं केली छप्पर फाड कमाई; जाणून घ्या 14 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Animal Box Office Collection Day 14: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला. (Animal Movie) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 63 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. ( Box Office) पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा आहे. ‘अ‍ॅनिमल’ने अवघ्या 14 दिवसांत 476.84 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात या चित्रपटाने 14 दिवसांत 784. 45 रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट जगभरात 1000 कोटी आणि भारतात 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)


या अॅक्शन थ्रिलरने पहिल्या दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 66.27 कोटी होते. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 7.83 टक्के वाढीसह 71.46 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 43.96 कोटी रुपये होते. पाचव्या दिवशी चित्रपटाने 37.47 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर, चित्रपटाने सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटींचा व्यवसाय केला आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी 23.50 कोटींचा व्यवसाय केला. 9व्या दिवशी चित्रपटाने 34.74 कोटींची कमाई केली, 10व्या दिवशी 36 कोटींची कमाई केली आणि 11व्या दिवशी चित्रपटाने भारतात 13 कोटींचा व्यवसाय केला.

12व्या दिवशी चित्रपटाने 12.72 कोटींचा व्यवसाय केला, 13व्या दिवशी 10.25 कोटींचा व्यवसाय केला आणि 14व्या दिवशीच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, ‘अ‍ॅनिमल’ ने 8.75 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने ‘जवान’ आणि ‘बाहुबली 2’चे रेकॉर्डही मोडले आहेत.

Bigg Boss 17: बिग बॉस 17 मध्ये प्रेक्षकांनी अंकिताला अन् विकी जैन यांना केला सपोर्ट

रणबीर कपूर स्टारर हा चित्रपट संदीप वंगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. जो ‘कबीर सिंह’ आणि ‘अर्जुन रेड्डी’च्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, प्रेम चोप्रा आदी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. दोघांचे अॅक्शन सीन्स खूप पसंत केले जात आहेत.रणबीर कपूरचा दमदार लूक आणि बॉबी देओलचा अभिनय यामुळे चाहत्यांना त्यांचे वेड लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube