Download App

आव्हाडांची वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच; न्यायव्यवस्थेवर काल बोलले पण आज इन्कार

Jitendra Awahad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) आत्तापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. नागपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरदूत न करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, याचं वाईट वाटतं असल्याचं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाडांच्या या विधानामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचं बोललं जात आहे.

दाल मखनीवर आडवा हात मारणं पडलं महागात; मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटलनं ग्राहकाला सर्व्ह केला शिजलेला उंदीर

जितेंद्र आव्हाड म्हणाले, न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला आहे, याचं मला वाईट वाटतं. मी बोलत नाही पुन्हा त्यावरुन वाद निर्माण होईल पण मला बोलावं लागतं. काही निर्णय असे घेतले जातात की आपल्याला पटकन कळतं की कुठेतरी जातीचा वास येतो, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी भर कार्यक्रमात केलं होतं.

‘संजय राऊतांनी त्यावेळी सल्ला का दिला नाही?’ आदित्यनाथांचा परखड सवाल

तसेच जातिव्यवस्थेच्या बाहेर न्यायव्यवस्था असली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर भारतातील प्रत्येक मानवाने मारावी. तुमचं सगळं आयुष्यच संविधानात बनवलं गेलं. हे भारतात कधी झालं असतं का? त्यामुळेच न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

‘माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी दाखवलंच नाही’; हातात SC चा निकाल घेत नार्वेकरांचं चोख प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी काल नागपुरातील कार्यक्रमात न्यायव्यवस्थेवर विधान केल्यानंतर आज त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना माध्यमांकडून न्यायव्यवस्थेवरील विधानाबद्दल विचारणा केली असता त्यांनी साफ इन्कार केल्याचं पाहायला मिळालं. पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, माझे विचार मी मांडत असतो, ते विचार समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरीही ठीक. मी कुठं म्हणलं माझ्या विचारांना मान्यता द्या. न्यायव्यवस्थेबद्दल मी असं कुठेही म्हटलेलं नाही, तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून पाहा, मी असं बोललेलोच नसल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ माध्यमांवर दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा वाद पेटण्याची शक्यता असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

follow us