Jitendra Awhad On Ajit Pawar Group : ज्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबतच तुम्ही असं करत आहात, शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह झाल्याचं कसं म्हणू शकता या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. विधी मंडळात सुरु असलेल्या अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार हुकूमशाह असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.
‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागील अनेक महिने बघतयं, अपात्रतेबद्दल वकिलांमध्ये वाद होताहेत. प्रतिज्ञापक्ष देण्यात आलं तेव्हा शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. या सर्व प्रतिज्ञापत्रांवर खासदार सुनिल तटकरेंची सही होती. सुनिल तटकरेंनी अनेक पदे उपभोगली आहेत. मग ते शरद पवार यांना हुकूमशाह कसं म्हणू शकतात? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
Box Office : रविवारी ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 287 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री
तसेच बारामतीमध्ये जो उभा करणार त्याला अजित पवार समजा असं अजित पवार बोलतात पण ज्या लोकांनी तुम्हाला मोठा केलं त्यांच्यासोबत असं करताय तुम्ही. काँग्रेसची सोबत सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला बंडखोरी करुन स्वतंत्र पक्ष टिकवणारे शरद पवार आहेत. शरद पवार स्वतः मैदानात उतरायचे कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नव्हते उतरत, शरद पवार यांच्या प्रत्येक बैठकीला कोण जायचं? प्रत्येक ठिकाणी निर्णय कोण घायचं? असेही प्रश्न उपस्थित करत आव्हाडांनी हल्लाबोल केलायं.
Maratha Reservation : ‘आरक्षण मागणारे रयतेतील मराठे, विरोध करणारे…’; आंबेडकरांचं मोठं विधान
दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल आम्हाला माहिती आहे. आम्ही डरपोक नाही. ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तरी चालेल, असा इशाराच जितेंद्र आव्हाडांनी यावेळी दिला आहे. तसेच केंद्र सरकारच्या एक राष्ट्र एक निवडणूक, एक देश एक गणवेश या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केलीयं. ते म्हणाले, हे देशाला आणि लोकशाहीला धोकादायक आहे, लोकशाहीला घातक आहे. तुमच्या प्रायव्हसीमध्ये घुसण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.