Ajit Pawar CM : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री व्हावे अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. ही इच्छा हे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकल्याचं पाहायला मिळलं त्यात अजित पवारांचे पोस्टर आघाडीवर होते. तसेच त्यानंतर स्वतः अजितदादांनी देखील मुख्यमंत्री होण्यची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री व्हावे. यासाठी राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भीष्मप्रतिज्ञा केली आहे. (NCP MLA Rajesh Patil take oath for Ajit Pawar CM of Maharashtra )
जातीय हिंसाचार ते बदल्यांचे दर, अजितदादांनी सगळचं काढलं…
कोण आहे हा आमदार?
जोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री होत नाहीत.तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये. असं राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी कोल्हापूरमध्ये म्हटलं आहे.चंडगडमध्ये पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.
तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याचं देखील आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या मतदारसंघामध्ये तुम्हाला लाल दिव्याची गाडी आणायची असेल तर आजपासून प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेणं गरजेच आहे. जोपर्यंत राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघामध्ये आणत नाही. तसेच जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही. तोवर वाढदिवस साजरा करू नका. अशी भीष्मप्रतिज्ञाच त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर अजिर पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यात आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चाना उधाण आले होते. दरम्यान अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.