‘काहीतरी गडबडच’ म्हणणाऱ्यांना रोहित पवारांचा टोला; म्हणाले, अजितदादांचीही..,

Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]

ते पक्षातील सर्वात अनुभवी नेते; काल टीका करणाऱ्या रोहित पवारांकडून जयंत पाटलांवर आज स्तुतीसुमनं

Rohit Pawar

Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल पाटलांना लगावला आहे.

बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणार सुटका?

रोहित पवार म्हणाले, अनिल पाटील ज्यांच्यामुळे मंत्री झाले त्यांच्यावर आक्षेप घेत आहेत. अजित पवार यांचीही चौकशी झाली होती. आज अनिल पाटील अजित पवार यांच्यामुळेच मंत्री आहेत. आपल्याच नेत्याबद्दल ते प्रत्यक्षपणे अशी कबुली देत असल्याचं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावला आहे.

Lok Sabha 2024 : रोहित पवारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार; शिंदेंनी मोठा शिलेदार फोडला

काय म्हणाले होते अनिल पाटील?
रोहित पवार यांच्या ईडीचौकशीबाबत माध्यमांकडून अनिल पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, काहीतरी गडबड घोटाळे केल्याशिवाय ही चौकशी होत नाही असं मोठं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं होतं. ज्यांची ज्यांची ईडीची चौकशी सुरू आहे किंवा भविष्यात होणार आहे त्यांनी काहीतरी गडबड घोटाळे केल्याशिवाय ही चौकशी होत नाही. हा केवळ पॉलिटिकल शो चालला आहे. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी झालीय. ज्यांची चौकशी झाली ते ईडीच्या कार्यालयात जायचे. चौकशी झाली की माघारी यायचे असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, , ईडीची चौकशी अशी सुरु आहे जशी मुंबई शहरामध्ये कुणीतरी सोन्याचा हंडा लपवला असंच सांगितलंय. त्यामुळे या कोपऱ्यात जा, त्या कोपऱ्यात जा, काहीही कर, जे विचारायचं ते विचार पण हा लपलेला कथित हंडा कुठे आहे हे शोधण्याचं काम काही लोकांकडे केलं जात आहे. सत्तेतल्या नेत्यांना वाटत असेल की आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं असल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

Exit mobile version