Download App

Rohit Pawar : ‘आता अजितदादांनीच उत्तर द्यावं’; शहांच्या दौऱ्यावरून रोहित पवारांचं थेट चॅलेंज !

Rohit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि राजकीय वर्तुळात चर्चा घडवून गेली. आता या मुद्द्यावर विरोधकांनी भाजपसह अजितदादांनाही कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तर थेट अजितदादांना उत्तर देण्याचे आव्हानच दिले आहे.

आमदार पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पत्रकार परिषदेत अमित शहांच्या दौऱ्यावर टीका करत अजितदादांना आव्हान दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत. पण, यावेळी अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चा रंगल्या आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता रोहित पवार म्हणाले, याचं उत्तर स्वतः अजितदादा यांनीच द्यावं. त्यांना महायुतीच्या सत्तेत का डावलण्यात येते आहे का, यावर मी काहीच बोलू शकत नाही असे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

म्हणून मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय बदलला

मी भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बारा वेळा बैठक घेतली. अमित शहा यांच्यासोबत तीस वेळा बैठका घेतल्या. इतकेच नाही तर मी बराक ओबामा यांच्यासोबतही बैठका घेत होतो. शेवटी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीनदा बैठक घेतली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की भाजप हा हेकेखोर आणि दडपशाही करणाऱ्यांचा पक्ष असल्याने मी माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. त्यावर हे खोचक प्रत्युत्तर आमदार पवार यांनी दिले. 

रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते… राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

follow us