Supriya Sule On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. हे मी म्हणत नाही, तर डाटा सांगतो. नागपूर ही क्राईम सिटी झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना प्रवेश द्या; नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
भाजप कार्यकर्त्यांवर शेलकी टीका :
भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमुक्त भारत म्हणून रान पेटवत होते, आज जेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवण वाढण्याची वेळ येते, तेव्हा त्याच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या विचारांचा माणून जेवायला बसतो यात मला आनंद आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या पण पंगतीला बसायची वेळी आली तेव्हा…असतं एकाच्या नशीबात, या शब्दांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुळेंनी शेलकी टीका केली आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा :
एका काळ होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की, भूकंप होणार असं वाटायचं, ही मोठी बातमी व्हायची पण आता दुर्देवं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जातात कुठलं धोरण ठरवायला नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
विशेष अधिवेशनासाठी 25 कोटी रुपये खर्च :
विशेष अधिवेशनासाठी सरकारने प्रतिदिवस 5 कोटी म्हणजे 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. आम्हाला अधिवेशनाला बोलावलं तेव्हा वाटलं की महिलांसाठी काहीतरी असेल पण महिला आरक्षण विधेयक हे इथून पुढील काळात 10 वर्षांनंतर लागू होणार आहे. त्यामुळे हे महिलांच्या समर्थनात दुसरं काही नसून सर्वात मोठा जुमला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, समृद्धी मार्गाने आपल्या आयुष्यात काय बदल झाला आहे का? कदाचित सर्वांचा वेळ वाचत असेल पण काही बदल झाला नाही, पुण्यात मेट्रो ट्रेनमध्ये पैसे घालण्यापेक्षा पीएमटी एसटी बसेसमध्ये पैसा खर्च करायला हवा होता, नागपूरच्या मेट्रोत फॅशन शो, वाढदिवस अन् पत्ते खेळतात हा प्रकल्प नूकसानात आहे. तेच पैसे जर एसटीमध्ये टाकले असते तर त्याचा फायदा झाला असता, असंही त्या म्हणाल्या आहेत.