दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना प्रवेश द्या; नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
MLA Nitesh Rane On Garaba : गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी गरबा आणि दांडिया यावरून अन्य धर्मीय लोकांना टार्गेट केलं आहे. नवरात्रोत्सवादरम्यान अनेक तरुण-तरुणी गरबा (Garaba) आणि दांडिया खेळण्यासाठी एकत्र येतात. मात्र, या काळात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना (Hindu) प्रवेश द्यावा, यासाठी त्यांचे आयडी कार्ड तपासा, असं विधान त्यांनी केलं.
लोकांचा मृत्यू होतोय संवेदनशीलता आहे की नाही ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
गरब्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कारण गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या, गरबा कार्यक्रमासाठी प्रवेश देतांना सर्वांचे आधार कार्ड तपासा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. विश्व हिंदू परिषदेच्या या मागणीला आमदार नितेश राणेंनी यांनी दुजोरा दिला.
आज माध्यमांशी बोलतांना राणे म्हणाले की, नवरात्र सुरू होईल आणि दांडिया खेळला जावा, ही समस्त हिंदू समाजाची मागणी आहे. गरब्यात सहभागी होणार लोक हिंदूच असावे, ही हिंदू समाजाने मागणी केली. ती मागणी अतिशय रास्त आहे. नवरात्र उत्सवात जे दांडियाचं आयोजन होतं, त्याला येणारे फक्त हिंदूच असले पाहिजेत. हिंदूंचे सन-उत्सवात सहभागी होऊन कुणी आमच्या महिलांकडे वाकड्या नजरेनं पाहत असेल तर बरोबर नाही, असं राणे म्हणाले.
ते म्हणाले, याच कालावधीत असंख्य लव्ह जिहादचे प्रकरणं होतात. या घटनांची माहिती आम्हाला आहे. गरबा खेळण्यासाठी अनेक इतर धर्मिय लोक भगवा पोशाख घालून येतात आणि हिंदू महिला-युवतींची छेड काढतात. त्यांना बोलून खोटं बोलून फसवल्या जातं. त्यामुळं जिथं गरब्याचं आयोजन होतं. तिथं गेटवरच आधारकार्ड सगळ्यांचे आधारकार्ड चेक करावे. ते व्यक्ती हिंदू असतील तरच त्यांना आत प्रवेश द्यावा, अशी मागणी राणेंनी दिली.
आपणच देवीची पजा करतो, मात्र, अन्य धर्मीय मूर्तिची पूजा करत नाहीत. त्यामुळं त्यांना प्रवेश देऊ नये. एखाद्याला दांडिया खेळायचा असेल तर ते त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावं, आम्ही त्यांची घरवापसी करू, असं राणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे.