लोकांचा मृत्यू होतोय संवेदनशीलता आहे की नाही ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
नांदेड : नांदेडमधील मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालयात (Nanded Goverment Hospital) झालेल्या मृत्यूप्रकरणी सरकार व विरोधकांमध्ये जुंपलेली आहे. आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही ब्लेम गेम खेळत नाही. परंतु अशीच परिस्थिती राहिली तर लोकांचा मृत्यू होत राहतील. लवकरच सरकारने याबाबत निर्णय घेतले पाहिजे. परंतु काही निर्णय घेतले जात नाही. संवेदनशीलता आहे का नाही, असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड मेडिकल कॉलेजचा विषय गंभीर आहे. चोवीस तासात चोवीस जणांचा मृत्यू झाला होता. यात नवजात बालकांचा समावेश होता. आता या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा हा 61 वर गेला आहे. लहान मुलांच्या वार्डात मी गेलो होतो. तेथे उपचार घेण्यासाठी 62 बालके होते. तीन नर्सेस केवळ उपचारासाठी होत्या. औषधे कमी होते हे वास्तव आहे. डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. पाचशे बेडची क्षमता असताना हजार-बाराशे रुग्णांवर उपचार सुरू होते.
स्मरणशक्ती सिलेक्टीव्ह असून चालत नाही, पवारांनीही संघाविषयी गौरवोद्गार काढले; चित्रा वाघांचा टोला
मला याचा राजकीय फायदा घ्यायचा नाही. परंतु आम्ही औषधे आणून दिले आहेत. खासगी डॉक्टर, नर्सेस उपलब्ध करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांनी एमपीएससीमार्फत डॉक्टरांची भरती करू म्हणाले. अमूक तमूक करू म्हणाले. त्यासाठी दोन-तीन महिने जातील. अशीच परिस्थिती राहिली तर लोक मरतील. त्यामुळे सरकारला संवेदनशीलता आहे का नाही, असा सवालही अशोक चव्हाणांनी उपस्थित केला आहे.
अधिकारी खासगी कसे घेणार ?
राज्य सरकार महसूलमधील अधिकारी हे कंत्राटी घेत आहे. त्यांचेही खासगीकरण करत आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे पदे खासगी कसे भरू शकतात. त्यांना अर्धन्यायिक स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यास कोण जबाबदार राहील, असा सवाही अशोक चव्हाणांनी केला आहे. माझा खासगी करणाला विरोध नाही. परंतु ज्या ठिकाणी शक्य आहे. त्याच ठिकाणी खासगी व्यक्ती घेतल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी संस्था नेमण्यात आल्या आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.