Download App

‘मंत्र्यांनीच सभा घेतल्या तर सगळचं अंदाधुंदी’; भुजबळांच्या सभेवर सुळेंचं बोट

Image Credit: Letsupp

Supriya Sule On Chagan Bhujbal : सत्ताधारी मंत्र्यांनीच जर आंदोलन, सभा घेतल्या तर मग सगळचं अंदाधुंदी असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर(Chagan Bhujbal) केली आहे. राज्यात सध्या मराठा-ओबीसी समाजात आरक्षणावरुन मोठं वादंग सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाच्या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी छगन भुजबळांनी जालन्यात ओबीसी मेळावा आयोजित केला. या सभेवर सुप्रिया सुळेंनी बोट ठेवत टीका केली आहे.

Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अदानींचा काय संबंध? अदानी समुहाकडून स्पष्टीकरण

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती की, सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी आपली सगळी भांडणं बाजूला ठेवत चर्चा केल पाहिजे, हक्काच्या मंत्र्यांवर अन्याय झालायं आणि नंतर आलेले मंत्री झाले असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने, जाहीर सभा मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा पण अंधश्रद्धा नाही :
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्ही सगळ्या महिला शिकलो आहोत. छत्रपतींचे आदर्श तर आहेच, पण शाहू-फुले-आंबेडकरांचे संस्कार आमच्यावर झाले. सावित्रीबाईंमुळे आम्ही शिकलो आहोत. आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी नेतृत्व करत आहोत. सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

जाहीर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा कॅबिनेटसमोर मागणी करा : सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सल्ला

शेतकऱ्यांना केंद्राकडून तातडीने मदत पाहिजे :
मला असं वाटत राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे. दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी आहे. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारला संपर्क करून २६०० कोटींची मागणी केली आहे पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालं आहे. शरद पवारसाहेब केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीने केंद्रातून टीम यायची. ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे पाहणी केली पाहिजे आणि त्यांची नोंद झाली पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज