Download App

‘धारदार भाषण होताच ED च्या नोटीसा येतात’; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर घणाघात

Image Credit: Letsupp

Supriya Sule : आम्ही धारदार भाषणे केल्यानंतरच ईडीच्या नोटीसा येत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर केला आहे. बारामतीत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेतला. प्रत्येक रविवारी मतदारसंघातील प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे आढावा घेत असतात. या आढाव्यादरम्यान, सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुळेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Ayodhya Ram Mandir : श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडे लोकशाही आहे, कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारमध्ये दडपशाही असल्याचं म्हणतात, त्यामुळे कोण कुठेही गेले तरीही त्यामध्ये काहीही गैर नाही. हे राज्य दडपशाहीच असून तुम्ही जर संसदेचा डेटा काढला तर समजेल की, 95 टक्के ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या नोटीसा विरोधी नेत्यांनाच पाठवलेल्या आहेत. आम्ही धारदार भाषणे केली की लगेच नोटीसा पाठवल्या जात असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Unseasonal Rain : पुन्हा अवकाळीचं संकट! राज्यात ‘या’ ठिकाणी थंडीत बरसणार पाऊस

तसेच आमच्यावर टीका करण्यासाठी भाजपकडे काहीच राहिलं नाही. काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजपने आपल्या पक्षात किती लोकं काँग्रेसचे घेतले आहेत. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक टीम आहे. आमच्याकडे इंडिया आघाडीच एक चेहरा आहे. इंडिया आघाडीत 36 जागांवर चर्चा झालील असून पुढील बैठक 2, 4 दिवसांत होईल त्यात इतर जागांवर निर्णय होणार आहे. मुंबईत 2-3 दिवसात महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. शरद पवार स्वतः ही बैठक घेऊ शकतात आणि सर्व जागांवर उमेदवार निश्चित होणार असल्याचंही सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

माजी टीकाकार मूग मिळून गप्प; अजितदादांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत आव्हाडांची खोचक टीका

दरम्यान, मी रामकृष्ण हरी आहे. महाराष्ट्र आणि संतांशी माझं जवळचं नातं आहे. अयोध्येत राम मंदिर सोहळा होत आहे. या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. 2027 मध्ये मंदिराचं काम पूर्ण होणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे. हे काम टप्प्याने होत आहे वेळेत पूर्ण व्हावं, मंदिराच्या सोहळ्यासाठी शुभेच्छा असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, यांच्यासह अनेक नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

follow us

वेब स्टोरीज