माजी टीकाकार मूग मिळून गप्प; अजितदादांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत आव्हाडांची खोचक टीका
Jitendra Awhad on Ajit Pawar: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंड करून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला आहे. तेव्हापासून दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवारांचा (Ajit Pawar) जुना व्हिडिओ करून त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. याच व्हिडिओवरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला.
पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?
राष्ट्रवादीने अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत अजित पवरांनी कशाप्रकारे शब्द फिरिवले हे दाखवून दिलं. हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे माजी टीकाकार मूग मिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाीह, तर साहेबांचा विश्वासही तोडला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वात तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात!, असं लिहिण्यात आलं आहे.
दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द!
आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी?
दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात!!#NCP #Maharashtra… pic.twitter.com/UZFnqaTE9w— NCP (@NCPspeaks) January 19, 2024
Ritika Shrotri : रितिका श्रोत्रीचं साडीत खुललं सौदर्यं, फोटोंवरून नजरही हटेना
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतांना आमदार आव्हाड म्हणाले, अजित पवार नेहमी म्हणतात, मी छाती ठोकून बोलतो आणि तेच खरं असतं. आम्हीही तेच सांगतोय, तुम्ही बोलला त्याच्या विरुद्द वागत आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गेल्यावर अजित पवार म्हणाले होते, उद्धव ठाकरेंच्या वडिलांचा पक्ष आणि चिन्ह आहे. मग राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवारांचं आहे, कशाला मागत आहात? असा सवालाही आव्हाडांनी केला आहे.
आव्हाड म्हणाले, तुम्ही शब्दांचे पक्के असल्याचं छाती ठोकून-ठोकून महाराष्ट्राला सांगता. मग आता काय झालं? अजित पवारांना मी धोकेबाज म्हणणार नाही. कारण, त्यांच्याएवढा मोठा दादा मी नाही. पण, माणसाने शब्दाचे भान ठेवले पाहिजे. तुम्ही एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सल्ला देत होता. मग तुम्हाला कुणी सल्ला द्यायचा? मुळात तुम्हाला सल्ला दिलेलाच आवडत नाही. अजित पवारांपुढं कुणाचं चालत नाही. ‘मैं खाता ना वही, दादा कहै वही सही’, असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला.