Download App

पवारांनी दंड थोपटले! गुडन्यूजचा दावा करणाऱ्या अनिल पाटलांना 24 तासांत दिली बॅड न्यूज

माढा : मी आताच त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असे म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आणि मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गुडन्यूज मिळणार असा दावा करणाऱ्या पाटील यांना पवार यांनी दंड थोपटत अवघ्या 24 तासातच चिंतेत टाकणारी बॅड न्यूज दिली असल्याचे बोलले जात आहे. माढा दौऱ्यात पवार माध्यमांशी बोलत होते. (NCP National President Sharad Pawar warning to NCP (Ajit Pawar Group) MLA and Minister Anil Patil)

काय म्हणाले होते अनिल पाटील?

आम्हीच एका बाजूला का राहिलो? असा पश्चाताप विरोधी पक्षात बसलेल्या (शरद पवार गटातील) आमदारांना होत आहे. त्यांच्या बोलण्यामुळे दिवाळीनंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी किंवा नंतर गोड बातमी मिळणार आहे असे वाटते, असे सूचक विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी काल नंदुरबारमध्ये बोलताना केले होते. त्यांच्या या सूचक विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का? असा सवाल विचारला जात होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी मंत्री पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : राज ठाकरेंनी पुन्हा जुन्या वादाला फोडलं तोंड

पवार काय म्हणाले?

अनिल पाटील यांच्या विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का? असा प्रश्न जनतेला पडला होता, तोच प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर पवार म्हणाले, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की,  मी आताच त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. ते निवडूनच येणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता गुडन्यूज मिळणार असा दावा करणाऱ्या पाटील यांना पवार यांनी दंड थोपटत अवघ्या 24 तासातच चिंतेत टाकणारी बॅड न्यूज दिली असल्याचे बोलले जात आहे.

राम शिंदेंकडून पार्थ पवारांचा पाहुणचार! रोहित पवारांचा ‘चार’ शब्दांचा पुणेरी टोला

शरद पवारांची अनिल पाटलांविरोधात रणनीती :

अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपमधील माजी आमदार, भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये  बी. एस. पाटील यांना पवारांनी पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांना अनिल पाटील यांच्याविरोधात उतरविण्याच रणनीती आखण्याची शक्यता आहे.

Tags

follow us