Sharad Pawar On Ajit Pawar Group : माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या त्यामुळे चिंता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी अजित पवार गटाला ठणकावूनच सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावली आहे. शरद पवारांसह अजित पवारांना निवडणूक आयोगाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता दिल्लीतून शरद पवारांनी अजित पवार गटाला ठणकावून सांगितलं आहे.
Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच असून काही जण चुकीच्या मार्गाने दुसरीकडे गेले आहेत. माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागो, आम्हाला चिंता नसल्याचं शरद पवार यांनी अजित पवार गटाला सांगितलं आहे.
सिध्दार्थच्या फायटर्सने घेतला कॉफी ब्रेक, हृतिकने घेतला सेल्फी, दीपिकानं दिलं स्माईल; फोटो व्हायरल
तसेच माझ्या नावाचा 70 लोकांनी प्रस्तावर दिला आहे. आयोगाचा निकाल काहीही लागू पण आमच्या बाजूनेच निकाल लागणार असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार गटात पक्ष आणि चिन्हासाठी सुरु असलेल्या वादात कोणत्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं
चिन्ह बदलण्याचा प्रयत्न पण चिंता नाही :
काँग्रेसच्या काळात 1996 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. माझं चिन्ह दोन बैलांची जोडी होतं. त्यानंतर तीन वर्षांनतर काँग्रेस पक्षात मोठा संघर्ष पेटला होता. काँग्रेसचे दोन गट पडले. त्यावेळी चिन्ह कोणाला द्यायचं हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
नवीन चिन्ह चरखा होता. तेव्हाही आम्ही जिंकलो. त्यानंतर आणीबाणी आली आणि इंदिराजींचा पराभव झाला. त्यानंतर नवीन चिन्ह आलं. पुन्हा काँग्रेसमध्ये दोन गट पडले. काँग्रेसचं पहिलं चिन्ह बैलजोडी, दुसरं चरखा, तिसरा गायवासरु, आणि चौथा हाताचा पंजा हे चिन्ह असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. निवडणूक चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होतोयं पण चिंता करण्याची गरज नाही. देशात परिस्थिती बदलत आहे. जनतेला माहित आहे कोणतं बटन दाबायचं ते, त्यामुळे चिंता नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.