Download App

“मग सुप्रियाताईंना हमासकडून लढण्यासाठी का पाठवत नाही?” : भाजप नेत्याचा पवारांना खोचक सवाल

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पॅलेस्टाईन समर्थनार्थ दिलेल्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर यापूर्वीच निशाणा साधला होता. अशात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही शरद पवार यांच्या पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मला वाटते शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील, असे म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला. (NCP president Sharad Pawar’s statement in support of Palestine is being heavily criticized by BJP)

पियुष गोयल यांनीही X करत शरद पवार यांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले, ‘इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असे बेताल वक्तव्य करतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. शेवटी पवार साहेब सुद्धा त्या सरकारचा भाग होते, ज्यांनी बाटला हाऊस चकमकीत अश्रू ढाळले होते आणि भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते झोपले होते.

Israel Hamas War : ..म्हणून फडणवीसांनी केली शरद पवारांना विनंती म्हणाले, तुम्हीही…

फडणवीसांचा पवारांना खोचक सल्ला :

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांना खोचक सल्ला दिला आहे. इस्त्रायल पॅलेस्टाइन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदललेली नाही. मात्र त्याचवेळी दहशतवाद मग तो कोणत्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात तेव्हा संपूर्ण जगान त्याची निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला.

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवा. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषतः 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करू नका तर दहशतवादाचा तीव्र शब्दांत धिक्कार करा अशी शरद पवार यांना विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.

Sanjay Raut : फडणवीसांकडून राजकारणासाठी ललित पाटीलचा वापर, त्यांना नैराश्याने ग्रासलय; राऊतांचा आरोप

काय म्हणाले होते शरद पवार ?

ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्त्रायल देश उदयाला आला. मला जास्त खोलात जायचं नाही. संपूर्ण जमीन पॅलेस्टाइनची आहे आणि इस्त्रायलने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. ती जागा, जमीन आणि घरे सर्व काही पॅलेस्टाइनच्या मालकीचे होते आणि नंतर इस्त्रायलने त्यावर कब्जा केला. इस्त्रायल हा बाहेरचा देश आहे आणि ही जमीन मूळ पॅलेस्टाइनची आहे. जे मूळचे इस्त्रायलचे रहिवासी आहेत त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज