Download App

राष्ट्रवादी फुटली! पवारांचा पुढचा प्लॅन काय?; राऊतांनी सांगितलं पुढचं नियोजन

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. अशातच आज राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होताच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मोठी फुट पडली आहे. आपल्या चाळीस समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केली आहे. त्यानंतर लगेच अजित पवारांनी आपल्या समर्थक राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ घेतली. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे ट्विट केले आहे. (NCP rebellion Sharad Pawars next plan Sanjay Raut said the next plan)

Ajit Pawar News : अजितदादांची उपमुख्यमंत्री म्हणून पाचवी शपथ…

महाराष्ट्राचे राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे राहु, होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट राऊतांनी केलं.

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी आज सकाळी त्यांच्या समर्थक आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. यानंतर संबंधित आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनात दाखल होते. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोणी कोणी घेतली शपथ?

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ

धनंजय मुंडे

धर्मरावबाबा आत्राम

आदिती तटकरे

संजय बनसोड

अनिल पाटील

अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार –

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज